Top News राजकारण

वीजबिलांवरून राज्य सरकारने जनतेचा विश्वासघात केलाय- देवेंद्र फडणवीस

मुंबई | वाढीव विजबीलाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय. सरकारने राज्यातील जनतेचा विश्वासघात केल्याचं फडणवीस म्हणालेत.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “वाढीव वीज बिलांबाबत राज्य सरकार जनतेला दिलासा देऊ शकतं. त्यासाठी ऊर्जा विभागाची स्थिती चांगली आहे. मात्र याठिकाणी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा अभ्यास कमी पडतोय.”

ठाकरे सरकारमधील मंत्र्यांनी वीजबिलात दिलासा देऊ असं म्हणत स्वत:ची पाठ थोपटून घेतली होती. मुळात घरातली सर्व उपकरणं 24 तास वापरली तरी देखील 5 वर्षे इतकं बिल येणार नाही तेवढं बिल 3 महिन्यांसाठी आलं असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.

फडणवीस पुढे म्हणाले, “ऊर्जा विभागासाठी दीड ते दोन हजार कोटींचा फटका फार मोठा नाही. केंद्र सरकार यासाठी कर्ज देण्यास राजी होतं. पण, राज्य सरकारने कर्ज घेतलं नाही आणि त्याचा फटका राज्यातल्या जनतेला बसतोय.”

महत्वाच्या बातम्या-

ममता बॅनर्जींचं पंतप्रधान मोदींना पत्र; ‘ही’ केली मागणी

“अटलजी आणि मोदींच्या जीवावर निवडून येऊन पद उपभोगली, तेच आता इतरांना शिकवत आहेत”

पालघर हत्याकांडाची सीबीआय चौकशी करा- नारायण राणे

“राऊत साहेब, हिंदुत्व हिंदुत्व नुसतं बोलायचं नसतं, कृतीतही उतरवावं लागतं”

राज्यातील जनतेने वीज बिल भरु नये- प्रकाश आंबेडकर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या