Devendra Fadnavis | काल 8 ऑक्टोबररोजी हरियाणा आणि जम्मू-काश्मिर विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. येथे पुन्हा एकदा भाजपने बाजी मारली आहे. येथे भाजप तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार आहे. हरियाणा विधानसभेच्या 90 जागांसाठी 5 ऑक्टोबरला मतदान झाले होते. त्याचे निकाल काल जाहीर झाले. भाजपच्या विजयाचा काल देशभर जल्लोष करण्यात आला. (Devendra Fadnavis)
महाराष्ट्रात देखील भाजपच्या विजयाचा जल्लोष साजरा झाला. मंगळवारी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला. लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी केलेल्या खोट्या प्रचाराचा भाजपला फटका बसला. अशा खोट्या प्रचाराला तशाच थेट पद्धतीने उत्तर देण्याचा निर्णय पक्षाने घेतलाय. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय होईल, असं फडणवीस म्हणाले.
नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
हरियाणा आणि जम्मू-काश्मिरमध्ये नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या कार्यक्रमाला जनतेने साथ दिली. हरियाणामध्ये अग्निवीर योजनेविरोधात अपप्रचार करण्यात आला. मात्र, जनतेने हा खोटा प्रचार नाकारला आणि भाजपला मोठं यश मिळवून दिलं.राहुल गांधी यांना हरियाणाच्या मतदारांनी पहिली सलामी दिली असून दुसरी सलामी महाराष्ट्रात मिळेल, असा खोचक टोला देखील फडणवीस यांनी विरोधकांना लगावला.
“राहुल गांधी यांच्या नाटक आणि नौटंकीला कुणीही भुलणार नाही हे या निवडणुकीने दाखवून दिले आहे. जम्मू काश्मीरमध्ये भारताचा, लोकशाहीचा विजय झालाय. येथे 370 वे कलम रद्द झाल्यानंतर रक्ताचे पाट वाहतील असे म्हणणाऱ्यांना तेथील मतदारांनी उत्तर दिलंय.”, असं फडणवीस म्हणाले. (Devendra Fadnavis)
हरियाणात भाजपची हॅट्ट्रिक
यावेळी फडणवीस यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर देखील निशाणा साधला. सकाळी नऊ वाजताच्या भोंग्याने रात्रीच तयारी करून ठेवली होती. आता मला विचारायचे आहे की, आता कसे वाटतेय असं म्हणत फडणवीस यांनी राऊत यांना टोला लगावला.
दरम्यान, हरियाणात 52 वर्षांनंतर सलग तिसऱ्यांदा एखादे सरकार स्थापन होताना दिसत आहे. हरियाणात गेल्या 10 वर्षांपासून भाजपाची सत्ता आहे. यावेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीत देखील भाजपाने पुन्हा दणदणीत विजय मिळविला आहे. येथे भाजपाला 48 जागा मिळाल्या आहेत. तर, कॉँग्रेसला 37 जागा मिळाल्या. (Devendra Fadnavis)
News Title : Devendra Fadnavis on Haryana Assembly Result
महत्वाच्या बातम्या –
आमदार बनलेल्या विनेश फोगाटची एकूण संपत्ती किती?, समोर आला आकडा
आज नवरात्रीचा सातवा दिवस, देवी कालरात्री ‘या’ राशींना देणार सुख समृद्धी!
अजित पवारांना गुलीगत धोका; ‘हा’ बडा नेता साथ सोडणार