युती तुटली तर आमच्यापेक्षा शिवसेनेला मोठा फटका बसेल- मुख्यमंत्री

मुंबई | लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती न झाल्यास दोन्ही पक्षांना याचा फटका बसेल, मात्र भाजपपेक्षा शिवसेनेला जास्त फटका बसेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यांनी हिन्दुस्थान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य केलं आहे. 

शिवसेना-भाजप वेगवेगळे लढले तर त्याचा फटका दोन्ही पक्षांना बसेल. मतांचं विभाजन होईल. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला याचा फायदा होईल, असं मुख्यमंत्री म्हणाले. 

आमच्यापेक्षा शिवसेनेला जास्त फटका बसले, त्यामुळे दोन्ही पक्षांनी युती करुन निवडणुकीला सामोरे जावं, असं त्यांनी म्हटलं. 

दरम्यान, आम्ही निवडणुकांची तयारी केली आहे. स्वतंत्र लढलो तर आमच्या तीन-चार जागा इकडे तिकडे होती, असं देखील ते म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या-

-पतंग उडवण्याच्या मांजामुळे 26 वर्षीय डॉक्टरचा गळा चिरून मृत्यू

-मीच असणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

-दर कपात केल्यानंतर सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्या!

-उद्धव ठाकरेंची डोकेदुखी वाढली, मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वीच शिवसेनेत वाद

-मुंबई आणि महाराष्ट्र उत्तर भारतीय लोक चालवतात- संजय निरुपम

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या