Maharashtra Budget | राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज (28 जून) अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक असून शेतकरी, महिला, युवा, मागासवर्गीय अशा सर्व घटकांच्या इच्छा पू्र्ण करणारा आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यांनी सरकारने दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण केली जातील, असं आश्वासन देखील दिलं.
उद्धव ठाकरे यांनी निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन केलेला हा थापांचा अर्थसंकल्प असल्याची टीका केली होती. याला प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले की, आजचा अर्थसंकल्प हा सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करणारा आहे. हा थापांचा नाही तर मायबापांचा अर्थसंकल्प आहे. शेतकऱ्यांना मोफत वीज देणारा ऐतिहासिक निर्णय सरकारने घेतलाय. हा शेतकऱ्यांना मदत करणारा आणि युवांना रोजगार देणारा अर्थसंकल्प आहे, असं फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन
पुढे फडणवीसांनी विरोधकांवर देखील निशाणा साधला. विरोधकांकडून खोटे नरेटिव्ह पसरवून लोकसभेच्या काही जागा जिंकल्या गेल्या. त्यातच आजचा अर्थसंकल्प बघून त्यांचे चेहरे (Maharashtra Budget) पडले आहेत.ते केवळ टीका करत होते. हा अर्थसंकल्प इतिहास निर्माण करणारा असेल, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी गटाला टोला लगावला.
अर्थसंकल्पाबाबत अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिलीये. ” मी दहाव्यांदा अर्थसंकल्प सादर केलाय. आम्ही नवखे नाही. वीज माफी द्यायची आमची इच्छा होती, विजेची माफी दिली आहे. लाभार्थींच्या खात्यात पैसे जाणार आहेत. कापूस, सोयाबीन संदर्भात देखील आम्ही सांगितलंय.”, असं अजित पवार म्हणाले.
उद्धव ठाकरेंची बजेटवर टीका
दरम्यान,आजच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी वर्ग, महिला, तरुण वर्ग तसेच इतर घटकांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या. यात सर्वात मोठी घोषणा ठरली ती ‘लाडकी बहीण योजना’ याद्वारे महिलांना दर महिन्याला पैसे मिळणार आहेत. तसेच वारकऱ्यांसाठी देखील काही घोषणा करण्यात आल्यात. मात्र, उद्धव ठाकरे यांनी या बजेटवर टीका केलीये.
“लोकांनी लोकसभेला जो दणका (Maharashtra Budget) दिला त्यानंतर राज्य सरकारने हे बजेट समोर ठेवलंय, पण जनता यांच्या भुलथापाला बळी पडणार नाही. जनतेला लुबाडायचं काम हे सरकार करत आहे. थापांचा महापूर आणि आश्वासनाची अतिवृष्टी म्हणजे आजचा अर्थसंकल्प आहे.”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केलीये.
News Title – Devendra Fadnavis on Maharashtra Budget
महत्त्वाच्या बातम्या-
आचार्य चाणक्यांनी सांगितलं विवाह आणि वयाचं महत्त्व!
अजित पवारांच्या बजेटमध्ये कुणाला काय मिळालं?; A To Z माहिती वाचा एका क्लिकवर
वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार, अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
सर्वात मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त; अजित पवारांची मोठी घोषणा
राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा; वाचा सविस्तर