बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“नाना पटोले फार हुशार आहेत, श्रेय घेण्यासाठी नाना पटोलेंची हुशारी”

मुंबई | इंधन दरवाढीमुळे नाना पटोले आणि आणि काही काँग्रेसच्या नेत्यांनी आज सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सायकलवर येऊन केंद्र सरकार विरोधी आंदोलन केलं. या आंदोलनावर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सडकून टीका केली आहे.

नाना पटोले यांचं आजचं आंदोलन हे बहुतेक राज्य सरकार विरोधी असावं, असा टोला फडणवीसांनी लगावला आहे. कारण, महाराष्ट्रात राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर 27 रुपये कर लावला आहे. शिवाय, केंद्राचा कर 33 रुपये आहे. ज्यापैकी, 4 रुपये डिलर कमिशन आणि 4 रुपये कृषी सेस आहे. त्यातून उर्वरित रक्कम जी आहे त्यापैकी 42 टक्के पैसे केंद्र सरकार राज्याला परत करतं, असं फडणवीसांनी सांगितलं आहे.

27 रुपये कर लावलेल्या राज्य सरकारच्या विरोधात नाना पटोले यांचं हे आंदोलन असेल, असं मत फडणवीसांनी व्यक्त केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना सांगितलं की, नाना पटोले हे खूप हुशार आहेत. कारण, यांनी सायकल वर येऊन इंधन दरवाढसंदर्भात विरोध व्यक्त केला आणि आजच्या अधिवेशनात कदाचित आता अजित पवार 2 ते 3 रुपये पेट्रोलचे दर कमी करतील आणि याचं श्रेय घ्यायला नाना पटोले तयार असतील, अशी बोचरी टीका देवेंद्र फडणवीस यांनी पटोलेंवर केली आहे.

काँग्रेसचं आंदोलन म्हणजे निव्वळ फार्स असल्याची टीका विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच काँग्रेसची अवस्था केविलवाणी झाली असल्याचं फडणवीस म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

संजय राऊतांनी केलं राहुल गांधींचं कौतुक, म्हणाले…

“पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फारच सरळमार्गी नेते आहेत”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर सोपवली ‘ही’ जबाबदारी, म्हणाले…

संजय राठोड यांचा राजीनामा घेण्याची गरज नव्हती, पण…- संजय राऊत

‘मुख्यमंत्र्यांचं आता त्यांचे युवराजही ऐकत नाहीत का?’; व्हिडिओ शेअर करत मनसे नेत्याची आदित्य ठाकरेंवर टीका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More