पुन्हा मुख्यमंत्रि‍पदासाठी निवड झाल्यावर देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य!

Devendra Fadnavis | विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 10 दिवसांनी महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळाला. देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. विधानभवनातील भाजप विधिमंडळ पक्ष कार्यालयात भाजपची (BJP) कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी एक वक्तव्य केलं आहे, ज्याची सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे.

काय म्हणाले फडणवीस?

बैठकीत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदी निवड झाली असताना, फडणवीस यांनी सर्वांंचे आभार मानले. भाजपने मला तीन वेळा मुख्यमंत्रिपदाची संधी दिली. त्यामुळे मी आभार मानतो. आणि म्हणून उद्या मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेतील, हे आता निश्चित झालं आहे.

जनतेसोबत बेईमानी झाली

फडणवीस (Devendra Fadnavis) याआधी 2014 आणि 2019 ला मुख्यमंत्री झाले होते. दरम्यान, आता उद्या (05 डिसेंबर) रोजी फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. बोलत असताना फडणवीस म्हणाले की, 2019 ला सुद्धा मला जनतेचा कौल मिळाला होता. मात्र, दुर्देवाने तो हिसकावून घेण्यात आला. यावेळी जनतेसोबत बेईमानी झाली होती.

त्या इतिहासात जात नाही. नवी सुरुवात करत आहोत. अडीच वर्षात आपल्याला त्रास दिला,. आमदारांना त्रास दिला. अशा परिस्थित अभिमान आहे, या अडीच वर्षात एकही आमदार सोडून गेला नाही. सर्व आमदार नेते संघर्ष करत होते. त्यातूनच 2022 मध्ये आपलं सरकार आलं. त्यातूनच आज आपल्या महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं, असं फडणवीसांनी म्हटलं.

News Title : devendra fadnavis on new cm of maharahstra

महत्त्वाच्या बातम्या-

“2019 ला बेईमानी झाली, खूप त्रास… “; तिसऱ्यांदा CM होणाऱ्या फडणवीसांची खदखद समोर

ते पुन्हा आले….; देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार

SBI बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, पगारही मिळणार भरभक्कम; ‘इथे’ करा अर्ज! 

विधीमंडळ गटनेतेपदी निवड होताच देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

अखेर ठरलंं! भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत सर्वात मोठा निर्णय