माझं पोट तेवढं कमी दाखवा; मुख्यमंत्र्यांची राज ठाकरेंना विनंती

मुंबई | व्यंगचित्र काढताना माझं पोट तेवढं कमी दाखवा, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना केली. ते झी समुहाच्या मराठी दिशा साप्ताहिकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणाआधी राज ठाकरे यांनी भाषण केलं. तसेच नव्या साप्ताहिकासाठी व्यंगचित्र काढण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर भाषणाला उभ्या राहिलेल्या मुख्यमंत्र्यांनी राज यांनी मिश्किल विनंती केली.

‘राज ठाकरे माझे मित्र आहेत त्यामुळे तुमच्याकडे माझी एक विनंती आहे. मी लठ्ठ आहे हे मला माहीत आहे, पण माझं व्यंगचित्र काढताना माझं पोट तिप्पट मोठं दाखवतात. माझी विनंती आहे नाक मोठं दाखवा, कान लांब दाखवा, हवं तर टक्कल दाखवा पण पोट थोडंसं लहान दाखवा’, असं ते म्हणाले.