बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“रझा अकादमी कोणाचं पिल्लू आहे हे सगळ्यांना माहित आहे”

अमरावती | त्रिपुरामधील कथित घटनेच्या निषेधार्थ अमरावती, मालेगाव व नांदेडमध्ये मोर्चे काढण्यात आले. या मोर्चांनंतर राज्यात अनेक हिंसक घटना घडल्या. विविध सरकारी अधिकाऱ्यांना व कार्यालयांना निवेदने देऊनही या मोर्चांना कालांतराने हिंसक वळण मिळालं. त्यानंतर भाजपने अमरावतीमध्ये बंद पुकारला. या बंद दरम्यान काही समाजकंटकांकडून दगडफेक करण्यात आली. यामध्ये 5 पोलिसांबरोबर 9 नागरिक जखमी झाले.

अमरावतीमध्ये ज्या ठिकाणी मोर्चांना हिंसक वळण लागले त्या भागांना राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी रझा अकादमीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, यापूर्वीदेखील अशीच हिंसा मुंबईमध्ये झाली होती. पोलिसांना मारण्याचे काम रझा अकादमीमध्येच का होते?, तेव्हाही काँग्रेसचेच सरकार होते. रझा अकादमी काँग्रेसच्या काळातच हल्ला का करते? आशिष शेलारांचे फोटो तुम्ही दाखवले पण उद्धव ठाकरेंचे दाखवले का?, काँग्रेसच्या नेत्यांचे दाखवले का? असे सवालही त्यांनी उपस्थित केले.

रझा अकादमी कोणाचं पिल्लू आहे हे सगळ्यांना माहित आहे. जर कोणाला वाटत असेल रझा अकादमी भाजपची बी टीम आहे, तर त्यावर बंदी घालण्याची मागणी मी करतो, असंही फडणवीस पत्रकारांशी बोलताना म्हणाले. नागरिकांनी एकत्र येऊन त्रिपुरातील घटनेचा 111 ठिकाणी निषेध केला. धार्मिकस्थळांच्या ठिकाणी हिंसक निदर्शने करण्यात आली. खोट्या माहितीच्या आधारावर हे मोर्चे कोणी आयोजित केले याची चौकशी करण्याची मागणी फडणवीसांनी केली.

12 नोव्हेंबरला अमरावतीमध्ये निघालेल्या मोर्चाला का परवानगी देण्यात आली?, देशात आणि राज्यात अराजकता तयार करायची होती का? असे खोचक सवाल यावेळी त्यांनी विचारले. हे मोर्चे नियोजित आहेत आणि दंगल घडवण्याच्या हेतूने विशिष्ट समाजाच्या, धर्माच्या लोकांच्या दुकानांना लक्ष करण्यात आल्याचा आरोपही फडणवीसांनी यावेळी केला.

थोडक्यात बातम्या

“महापुरास मोदी सरकार जबाबदार असल्याचा आरोप न केल्याबद्दल राज्य सरकारचे धन्यवाद”

नवज्योतसिंग सिद्धू यांनी आधी स्वत:च्या मुलांना सीमेवर पाठवावे, मग….

पंकजा मुंडे भाजपवर नाराज? ‘त्या’ वक्तव्यामुळे चर्चांना उधाण

दिलासादायक! देशात 538 दिवसानंतर पहिल्यांदाच सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद

अनुपमा मालिकेतील ‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं दु:खद निधन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More