बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सरदार तारासिंग यांच्या निधनाने एक सच्चा समाजसेवक हरपला- देवेंद्र फडणवीस

मुंबई | भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मुंबईतील मुलुंड मतदारसंघातील माजी आमदार सरदार तारा सिंह यांचं निधन झालं आहे. आमदार सरदार तारा सिंह यांच्या निधनानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. ते म्हणाले, “लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या 40 वर्षांच्या प्रदीर्घ कार्यकाळात अतिशय प्रामाणिक आणि निष्कलंक व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचा लौकिक होता. त्यामुळेच कार्यसम्राट ही उपाधी जनतेने त्यांना बहाल केली होती, त्यांचे निधन संपूर्ण भाजपा परिवारासाठी धक्कादायक आहे.”

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही माजी आमदार सरदार तारा सिंह यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ते म्हणाले, “महाराष्ट्र भारतीय जनता पक्ष परिवारातील अतिशय ऊर्जावान व्यक्तीमत्त्व, मुंबई भाजपाचे वरिष्ठ नेता आणि मुलुंड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सरदार तारासिंहजी यांच्या निधनाचे वेदनादायी वृत्त समजले. सरदारजी पक्षातील अतिशय ऊर्जावान व्यक्तित्व होतं.”

सरदार तारा सिंह यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. सरदार तारा सिंह हे मुंबईतील मुलुंड मतदारसंघातून सलग चार वेळा आमदारपदी निवडून आले होते. मात्र 2019 मधील विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती.

महत्वाच्या बातम्या-

“मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करा”

मुंबईतील 144 कलम हे कोरोनामुळे नव्हे, तर…- चंद्रकांत पाटील

सलामीचा सामना खेळण्याआधी चेन्नईच्या संघाला दिलासा; ऋतुराजचा पहिला कोरोना अहवाल निगेटीव्ह

ड्रग्सप्रकरणी ABCD फेम अभिनेता किशोर शेट्टीला अटक

“शिवसेनेचं मुंबईवरील बेगडी प्रेम उघड?, मरिन ड्राइव्हच्या किनाऱ्याला ढोंगीपणाचा गाळ दिसला”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More