फडणवीसांना कितव्या रांगेत बसवलं?, दिल्लीतील गोष्टीची महाराष्ट्रात जोरदार चर्चा

Devendra Fadnavis | लोकसभा निवडणुकीचा निकाल जनेतेच्या समोर आल्यानंतर महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का बसल्याचं चित्र पहायला मिळालं. भाजपने 400 पारचा नारा दिला खरा. मात्र त्यांच्या स्वप्नाला महाराष्ट्रात सुरुंग लागल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. निकालानंतर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याच्या चर्चा आहेत. दरम्यान, आज 07 जून रोजी नवी दिल्ली येथे NDA आघाडीच्या सदस्यांची बैठक पार पडली.

बैठकीत काय घडलं-

NDA आघाडीच्या नवनिर्वाचित खासदारांची जुन्या संसदेत बैठक झाली. यावेळी NDA आघाडीचे खासदार, मुख्यमंत्र्यांसह युतीचे वरिष्ठ नेत्यांनी या बैठकीला हजेरी लावली. मात्र, बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या जागेची चर्चा झाली.

महाराष्ट्रात भाजपला फक्त 9 जागा मिळवता आल्या आहेत. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) महाराष्ट्रात भाजपचा सर्वात महत्त्वाचा चेहरा आहेत आणि त्यांच्या नेतृत्त्वात भाजपला मिळालेल्या जागा हे एकप्रकारे अपयश मानलं जात आहे. त्यामुळे दिल्ली दरबारी देवेंद्र फडणवीस यांचं वजन कमी झाल्याचं मानलं जात आहे. NDA नेत्यांच्या बैठकीत फडणवीसांना मिळालेली जागा हे एक प्रकारे यांचंच द्योतक मानलं जात आहे.

सोशल मीडियावर फोटो व्हायरल-

दुसरीकडे, एनडीएचे घटकपक्ष असल्याने त्या पक्षांचे प्रमुख या नात्याने एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना महत्त्वाच्या जागा मिळाल्या होत्या. महाराष्ट्रात आता हेच फोटो व्हायरल केले जात आहेत. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना सन्मानाची जागा तर देवेंद्र फडणवीसांना दुय्यम जागा, अशा अर्थाने हे फोटो आता व्हायरल होत आहेत.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तसेच सरकारमधून बाहेर राहण्याची इच्छा व्यक्त केली होती, मात्र दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठांनी तूर्तास त्यांची विनंती मान्य केलेली नाही. यामुळे कार्यकर्त्यांचं मनोबल कमी होईल, असं वरिष्ठांचं म्हणणं आहे. नरेंद्र मोदी यांचा शपथविधी झाल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत निर्णय घेतला जाईल, असं सांगितलं जातंय.

News Title : Devendra Fadnavis photo goes viral

महत्त्वाच्या बातम्या-

‘मासे न खाताच…’; वसंत मोरेंनी राज ठाकरेंना डिवचलं

‘जेव्हा माझ्यावर वाईट वेळ येईल तेव्हा…’; सलमान खानचं वक्तव्य चर्चेत

मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांनंतर उपमुख्यमंत्री पदासाठी ‘या’ नेत्याचं नाव चर्चेत

कंगनाच्या कानाखाली लगावणाऱ्या CISF महिलेला थेट बॉलिवूडकडून ऑफर

“बरं झालं शिवरायांच्या काळात…”, शरद पोंक्षे यांच्या वक्तव्याने वाद पेटण्याची शक्यता