‘मैं समंदर हूं, लौटकर आऊंगा…’, तरुण महापौर ते मुख्यमंत्री; फडणवीसांचा थक्क करणारा प्रवास

Devendra Fadnavis | विधानसभेत भाजपाला शंभरहून अधिक जागांवर यश मिळवून देण्यामागील चाणक्य म्हणजे देवेंद्र फडणवीस. मुख्यमंत्री, विरोधीपक्ष नेता आणि उपमुख्यमंत्री अशी सर्व पदे भूषवलेले फडणवीस आता पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेत आहेत. आज (5 डिसेंबर) मुंबईतील आझाद मैदानावर फडणवीस यांच्यासह महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री पदी कुणाची वर्णी लागणार, याबाबत चर्चा होत्या. काल, भाजपच्या विधीमंडळ पक्षाचे नेते म्हणून फडणवीस यांची निवड झाल्याने तेच मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झालं. फडणवीस हे तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत आहेत. इतक्या वर्षांतला त्यांचा राजकीय प्रवास हा थक्क करणारा राहीलेला आहे. (Devendra Fadnavis)

देवेंद्र फडणवीस यांची राजकीय सुरुवात-

देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस हे नाव आता महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठं नाव बनलं आहे. फडणवीस यांची राजकीय सुरुवात ही भाजपशी संलग्न असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून झाली. ते या संघटनेचे सक्रिय सदस्य होते. त्यांनी प्रथम नागपूर महापालिका निवडणूक राम नगर प्रभागातून जिंकली. 1997 साली फडणवीस हे नागपूर महापालिकेचे सर्वात तरुण महापौर बनले.वयाच्या 29 व्या वर्षी ते महापौर बनले होते.

फडणवीस यांचे वडील गंगाधर फडणवीस हे नागपूरचे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. तर, त्यांच्या आई सरिता या विदर्भ गृहनिर्माण महामंडळाच्या माजी संचालिका होत्या. फडणवीस यांचे शालेय शिक्षण हे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नावावर असलेल्या इंदिरा कॉन्व्हेंटमध्ये झालं. देशात आणीबाणी लागली होती तेव्हा सरकारविरोधी आंदोलनात भाग घेतल्याने देवेंद्र फडणवीस यांच्या वडिलांना तुरुंगवास भोगावा लागला होता. ज्यांच्यामुळे वडील तुरुंगात गेले त्यांच्या नावावर असलेल्या शाळेत आपण शिकणार नाही, असं फडणवीस लहानपणी म्हणाले होते. यानंतर त्यांनी सरस्वती विद्यालयमधून शिक्षण घेतलं. संघर्षाची ही भावना त्यांच्यात लहानपणीच निर्माण झाली.पुढे नागपूरमधून त्यांनी कायद्याची पदवी घेतली. (Devendra Fadnavis)

1997 मध्ये महापौर बनल्यानंतर फडणवीस यांनी पहिल्यांदा 1999 मधून पश्चिम नागपूर विधानसभा लढली आणि जिंकलीसुद्धा. या मतदारसंघातून ते सलग दोनदा आमदार झाले. त्यानंतर ते दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून चारवेळा विजयी झाले. 1999 पासून ते महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत नागपूरचे प्रतिनिधित्व करत आहेत. 2013 मध्ये फडणवीस हे भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष झाले. 2014 मध्ये देशात मोदी लाट आली. महाराष्ट्रातील यशामागे फडणवीस यांनीही खूप मेहनत घेतली होती. 2014 मध्ये भाजपाच्या आमदारांनी त्यांची विधीमंडळ पक्षनेते पदी निवड केली.

31 ऑक्टोबर 2014 साली देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्यानंतर ते महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरले होते. 2014 ते 2019 ही 5 वर्षे फडणवीस मुख्यमंत्रीपदी होते. 2019 च्या निवडणुकीत भाजप-शिवसेना युती होती. त्यात भाजप आणि शिवसेनेला मोठं यश मिळालं. मात्र, उद्धव ठाकरे यांनी भाजपशी युती तोडत कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेससोबत आघाडी केली. याचवेळी 23 नोव्हेंबर 2019 मध्ये फडणवीस यांनी अजित पवार यांना सोबत घेऊन सरकार स्थापन केले. तेव्हा सकाळी 5 वाजता दोघांनी शपथ घेतली होती. हा पहाटेचा शपथविधी अजूनही महाराष्ट्राच्या राजकारणात गाजत असतो. मात्र, हे सरकार टिकलं नाही. यानंतर अडीच वर्ष राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं.

मात्र, 2021 मध्ये शिवसेनामध्ये बंडखोरी झाली.एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसोबत भाजपशी हातमिळवणी केली. तेव्हा एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे उपमुख्यमंत्री बनले. आता नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला 132 जागांवर यश मिळालं आहे. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी भूषवलेली पदे-

मुख्यमंत्री
विरोधीपक्ष नेते
उपमुख्यमंत्री
नागपूरचे महापौर
नगरसेवक (Devendra Fadnavis)

News Title – Devendra Fadnavis political journey

महत्त्वाच्या बातम्या : 

“शिंदेंमध्ये दिल्लीसोबत पंगा घ्यायची हिंमत नाही, त्यामुळे…”; संजय राऊतांनी डिवचलं

अखेर फडणविसांच्या मनधरणीला यश, एकनाथ शिंदे घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ!

शपथविधीपूर्वीच सोनं झालं स्वस्त, ‘इतक्या’ रुपयांनी घसरले भाव

मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा कुठे व किती वाजता? जाणून घ्या सर्व माहिती एका क्लिकवर

सर्वात मोठी बातमी! शिंदे गटातील ‘या’ नेत्यांची मंत्रीपदी वर्णी?