राज्यात राजकीय भूकंप, देवेंद्र फडणवीस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Devendra Fadnavis | लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election 2024) महाराष्ट्रामध्ये भाजपला जोरदार फटका बसला. महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत यश मिळवलं. एनडीएला 19 जागांवरच समाधान मानावं लागलं. या निकालावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस मोठा निर्णय घेणार?

आता मला विधानसभेसाठी पूर्ण उतरायचं आहे, मला सरकारमधून मोकळं करावे, अशी विनंती मी नेतृत्त्वाकडे करणार आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

भाजपच्या कार्यकर्त्यांनी उत्तम काम केलेलं आहे. मुंबईच्या अध्यक्षांनी स्वतः लक्ष घातलं. जो पराभव झाला त्याची सर्व जबाबदारी माझी आहे. सर्व जबाबदारी देवेंद्र फडणवीस स्वीकारत आहे. आता मला विधानसभेसाठी  पूर्ण उतरायचं आहे, असं फडणवीसांनी (Devendra Fadnavis) म्हटलंय.

जनतेने दिलेले जनादेश माणून आम्ही पुढील तयारी करण्याचा निर्णय घेतला. ज्यांना जास्त जागा मिळाल्या, त्यांचं अभिनंदन करतो, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis | आम्ही उत्तर देऊ शकलो नाही- देवेंद्र फडणवीस

काही ठिकाणी अँटीइंकबसी दिसली. काही ठिकाणी कांद्याचा प्रश्न होता. सोयाबीन आणि कापूस याचा देखील प्रश्न होता. सरकारने आरक्षण दिल्यानंतर एक नरेटीव्ह तयार केला त्याला आम्ही उत्तर देऊ शकलो नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

भाजपला राज्यात लोकांनी नाकारले अशी परिस्थिती नाही. सम-समान मते मिळाली आहेत. आज आम्ही बसून निवडणुकीचा आढावा घेतला आहे. कोणते मुद्दे होते याचा आम्ही विचार केला, असं फडणवीसांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या- 

“काही पण करा फडणवीस साहेब, मायच्यान पवार साहेबांचा नाद करु नका”

इंडिया आघाडी करु शकते सत्तेवर दावा, देशात असा पालटू शकतो खेळ

“माझ्या नादी लागू नका, तुमचा कार्यक्रमच लावणार”; मनोज जरांगेंचा थेट इशारा

भाजपची धाकधूक वाढली! नितीश कुमारसोबत एकाच विमानाने ‘या’ नेत्याने गाठली दिल्ली

लोकसभा निकालावर शरद पोंक्षेंची पोस्ट, म्हणाले ‘हिंदूच…’