Devendra Fadnavis | मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजेच काल 19 नोव्हेंबररोजी भाजप आणि बहुजन विकास आघाडी यांच्या कार्यकर्त्यांत तूफान राडा पाहायला मिळाला. भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याचा आरोप बविआने केला आहे. विनोद तावडे (Vinod Tawde) हे विरारमधील एका हॉटेलमध्ये कोट्यवधी रुपये घेऊन आले होते, असा दावा बविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी केलाय. (Devendra Fadnavis)
या आरोपांनी राज्यभर खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडीकडून या प्रकरणी भाजपला टार्गेट केले जात आहे. सोशल मीडियावर देखील या प्रकरणी अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक मीम्स आणि मतं व्हायरल होत आहेत. यावरच आता महाराष्ट्राचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते आज सकाळी माध्यमांशी संवाद साधत होते.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
“जेव्हा निवडणुकीमध्ये पराभव दिसतो, तेव्हा असे प्रकार घडतात.विनोद तावडे आमचे राष्ट्रीय महासचिव आहे. ते फक्त कार्यकर्त्यांना भेटायला गेले होते,” असं फडणवीस म्हणाले आहेत. तसेच पुढे बोलताना, “कुठलाही पैसा त्यांच्याकडे सापडलेला नाही. कुठलेही आक्षेपार्ह गोष्टी सापडलेल्या नाहीत. उलट त्यांच्यावरच हल्ला झालेला आहे. आमचे उमेदवार राजन नाईक यांच्यावर हल्ला झालेला आहे,” असा आरोप फडणवीसांनी (Devendra Fadnavis) केला आहे.
“महाविकास आघाडीच्या इकोसिस्टीमने त्यांचा दिसणारा पराभव कव्हर करण्यासाठी ही कव्हर फायरिंग केलेली आहे. विनोद तावडे दोषी नाहीत. उलट खासदार सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांच्यावर जो आरोप करण्यात आलाय, तो अत्यंत गंभीर आहे.”, असं फडणवीस म्हणाले आहेत.
सुप्रिया सुळे यांच्यावरील आरोपांवर फडणवीसांची प्रतिक्रिया
दरम्यान, पुण्यातील माजी पोलीस अधिकारी रवींद्र पाटील यांनी निवडणुकीत परकीय चलन वापरल्याचा व अनेक आर्थिक व्यवहारांसाठी बिटकॉइनचा वापर केल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर आरोप केलाय. यावरूनच फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला.
आज राज्यात मतदान पार पडते आहे. मात्र, याच्या आदल्या दिवशी म्हणजेच मंगळवारी अनेक नाट्यमय घडामोडी राज्यात घडल्या. विनोद तावडे यांच्यावर कोट्यवधी रुपये वाटल्याचा आरोप करण्यात आला. तर, रात्री भाजपा खासदार व प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांच्यावर बिटकॉइन घोटाळ्याचा आरोप केला. त्यांनी कथित पुरावे म्हणून काही कॉल रेकॉर्डिंग्स व व्हॉट्सअॅप चॅट्सचे स्क्रीनशॉट देखील सादर केले. या घटनांची आता राज्यभर चर्चा सुरू आहे.(Devendra Fadnavis)
News Title – Devendra Fadnavis reaction to allegations against Vinod Tawde
महत्त्वाच्या बातम्या-
विनोद तावडेंच्या डायरी संबंधित नव्या दाव्यानं राजकारणात पुन्हा खळबळ!
शिंदे गटाच्या नेत्याच्या संबंधित गाडीत सापडले कोट्यवधी रुपये!
ऐन निवडणुकीत भाजपचा सुप्रिया सुळेंवर अत्यंत गंभीर आरोप, राजकारणात खळबळ
‘मला दहा मिनिटं…’; विनोद तावडेंचा आणखी एक खळबळजनक व्हिडिओ समोर
नागरिकांनो ‘या’ पैकी कोणतेही एक कागदपत्र असले तरी करता येणार मतदान!