बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कार्यक्षमतेवरच देवेंद्र फडणवीस यांचं प्रश्नचिन्ह

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय नेतृत्व दिसत नाही, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. सर्वपक्षीय बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

राजकीय नेतृत्वच नसल्याने प्रशासनात गोंधळ आणि समन्वयाचा अभाव आहे. आता ज्या प्रकारे निर्णय घेताना राजकीय नेतृत्व दिसले पाहिजे, प्रशासनातील अधिकाऱ्यांमध्ये समन्वय घडवण्याचे काम राजकीय नेतृत्वाचे असते. पण हा समन्वय घडत नाही, तो घडवला पाहिजे, ही माझी मागणी आहे, असं ते म्हणाले.

मुंबईची परिस्थिती गंभीर आहे. ती हाताबाहेर जात आहे अशी शंका आहे, त्यामुळे मुंबईकडे विशेष लक्ष द्यायला पाहिजे. आकडे लपवणे वगैरे भानगडीत न पडता या परिस्थितीशी कशाप्रकारे मुकाबला करता येईल हे पाहिले पाहिजे, असंही ते म्हणाले.

दरम्यान, आजवर केंद्राकडून महाराष्ट्राला सर्वाधिक मदत देण्यात आलेली आहे. भाजपशासित राज्यांपेक्षाही जास्त मदत महाराष्ट्राला देण्यात आली आहे, तसेच मुख्यमंत्री म्हणाले राजकारण करू नये. आम्ही राजकारण करत नाही. त्यांच्याबरोबर असलेले लोक काय करत आहेत ते पाहावे. काहीही झाले तरी केंद्राकडे बोट दाखवणे योग्य नाही, असंही आपण बैठकीत मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

ट्रेंडिंग बातम्या-

राज्यातील सर्व दुकाने उघडण्यास मुभा; राज्य सरकारचा मोठा निर्णय

“नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भक्तांकडे या प्रश्नाचं उत्तर आहे का?”

महत्त्वाच्या बातम्या-

सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितल्या ‘या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी

उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीत मास्क का घातला नाही?; राज ठाकरेंनी दिलं हे उत्तर

परप्रांतीय गावी गेल्याने उपलब्ध रोजगार स्थानिकांना द्या; राज ठाकरेंची मागणी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More