Devendra Fadnavis l राज्यात देवेंद्र पर्वाला सुरवात झाली आहे. कारण काल देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. मात्र आता फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर फडणवीस पूर्ण फॉर्ममध्ये आहेत. फडणवीस यांनी काल मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पत्रकारांसोबत संवाद देखील साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी त्यांची पुढील पाच वर्षाची रणनीती नेमकी काय असणार हे स्पष्ट केलं आहे.
पुढील पाच वर्षांची रणनीती काय? :
गेल्या कार्यकाळात आम्ही शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांच्यासोबत 50 षटकांचे सामने खेळलो, तर अजितदादा पवार आमच्याकडे आल्यानंतर आम्ही टी-20 खेळलो, मात्र आता आम्हाला कसोटी सामना खेळायचा आहे. म्हणजे पाच वर्षांची दीर्घ खेळी होईल. तसेच ज्यामध्ये आमच्या इच्छेनुसार क्षेत्ररक्षणाची देखील व्यवस्था करू. विधानसभा निवडणुकीत तब्बल 132 आमदार निवडणून आणत देवेंद्र फडणवीस यांनी भाजपला राज्यात सगळ्यात मोठा पक्ष बनवल आहे. मात्र आता त्यांची नवी इनिंग सुरु झाली आहे. तसेच आता शपथविधीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार हा नागपूर अधिवेशनाच्या आधी होणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे.
परंतु, राज्यातील महत्त्वाच्या खात्यांवर आपले प्रतिनिधी नेमणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्रालयाची मागणी केली आहे. मात्र ती देवेंद्र फडणवीस यांना स्वतःकडे ठेवायचे आहे. याशिवाय त्यांनी उद्योग, महसूल, पाटबंधारे, नगरविकास, सामाजिक न्याय मंत्रालय ही खाती देखील मागितली आहे. परंतु, या खात्यांवर राष्ट्रवादीने देखील दावा केला आहे.
Devendra Fadnavis l देवेंद्र फडणवीसांपुढे नेमकी कोणती आव्हानं? :
देवेंद्र फडणवीसांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा हाती घेतल्यानंतर त्यांना अनेक आव्हानांना सामोरे जायचे आहे. यावेळी त्यांना सर्वात आधी निवडणुकीत दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करायची आहेत. त्यासाठी त्यांना तब्बल 7.82 लाख कोटी रुपयांचा निधी लागणार आहे.
याशिवाय दुसरं सर्वात मोठं आव्हान म्हणजे मराठा आरक्षण. कित्येक दिवसांपासून प्रलंबित असलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न देखील त्यांना मार्गी लावावा लागणार आहे. तसेच तीन पक्षाचे सरकार असल्याने समन्वय राखून सगळे निर्णय देखील त्यांना घ्यावे लागणार आहेत. कारण मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झालेले एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना समाधानी ठेवणे फडणवीसांसाठी सोपे नाही.
News Title – Devendra Fadnavis revealed his strategy for the next 5 years
महत्त्वाच्या बातम्या :
“पवित्र ठिकाणी असताना कुठे त्या गटाराचं नाव…”, ‘या’ बड्या नेत्यावर चित्रा वाघ यांची टीका
एकनाथ शिंदेंच्या भूमिकेबद्दल देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट!
रेल्वे विभागात नोकरीची सुवर्णसंधी! जाणून घ्या पात्रता आणि रिक्त पदे
शाकाहारी लोकांना Heart attack चा धोका सर्वात कमी?, नवीन संशोधन समोर
वर्षाच्या शेवटच्या महिन्यात काय आहेत सोने-चांदीचे दर?, जाणून घ्या एका क्लिकवर