बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मी पुन्हा येईन म्हटलो पण केव्हा सांगितलं नव्हतं, अजूनही सांगतो पुन्हा नक्की येणार”

मुंबई | राज्याच्या राजकारणातील मातब्बर नेते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आपल्या वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत फडणवीसांना प्रचारावेळी मी पुन्हा येईन या वाक्यानं धुमाकूळ घातला होता. आता परत एकदा ते वाक्य ऐकायला मिळालं आहे.

माझा महाकट्टा कार्यक्रमात फडणवीस दाम्पत्यांनी दिलखुलास मतं मांडली आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी राज्यातील अनेक गोष्टींवर भाष्य केलं आहे. मी पुन्हा येईन म्हटलो पण केव्हा येईन सांगितलं नव्हतं, असं देखील फडणवीस म्हणाले आहेत.

देवेंद्र फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर राज्यात पुन्हा एकदा वाद उद्भवण्याची शक्यता आहे. कारण विधानसभा निवडणुकीनंतर देखील फडणवीस यांना विरोधक मी पुन्हा येईन याच वक्तव्यावरून धारेवर धरत असतात.

थोडक्यात बातम्या – 

भाजपचा ‘हा’ बडा नेता अडचणीत; अटकेची टांगती तलवार कायम

इम्तियाज जलील म्हणतात, “मला आता हालचालींवर लक्ष द्यावं लागेल”

“एक लांडगा महाराष्ट्राच्या कळपात घुसलाय”; पडळकरांची शरद पवारांवर जोरदार टीका

“संजय राऊत यांना माझ्या पत्नीची मागी मागावीच लागेल”

“राज ठाकरे तुम्ही संभाजी महाराजांच्या चरणी नाक घासून माफी मागा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More