पुणे महाराष्ट्र

आपण आजन्म आमदार, खासदार असल्याच्या थाटात राहून चालत नाही- देवेंद्र फडणवीस

पुणे | राजकीय व्यक्तीचे आयुष्य पाच वर्षांचे असल्याने नेत्याला पाच वर्षांनी जनतेसमोर जावे लागते. आपण आजन्म आमदार, खासदार असल्याच्या थाटात राहून चालत नाही, असं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रथम वर्ष कार्यअहवालाचं प्रकाशन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. यावेळी ते बोलत होते.

आमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रधानसेवक असतील तर आम्ही कोणीच मालकाच्या भूमिकेत जाऊ शकत नाही. लोकप्रतिनिधी या सेवकाने मालक असलेल्या जनतेप्रति उत्तरदायी असलं पाहिजे, असंही फडणवीस म्हणाले.

समाजाने कसोटीच्या क्षणांसाठी नेत्याला विश्वासाने पुढारलेपण दिलेले असते. नेत्याला आत्मविश्वास नसेल तर समाजाने कोणाकडे पाहायचे? फलक लावून दादा-भाऊ होणारे खूप झाले आहेत. पण अशाने नेता होता येत नाही, असं फडणवीसांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक ‘स्वीकारार्ह’ नेते; ‘मॉर्निंग कन्सल्ट’च्या सर्वेक्षणाचा दावा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सरदार बुटा सिंग यांचं निधन

‘जमत नसेल तर…’; नवनीत राणा यांचं ठाकरे सरकारवर टीकास्त्र

खळबळजनक! मुंबईत थर्टी फर्स्टच्या पार्टीत तरुणीची हत्या; हत्येचं कारण ऐकून सुन्न व्हाल

‘4 जानेवारीला ठोस निर्णय घ्या, अन्यथा…’; शेतकऱ्यांचा केंद्राला इशारा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या