बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच देवेंद्र फडणवीसांनी क्षमा मागितली!

मुंबई  | परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या गंभीर आरोपांमुळे राज्यातील राजकारणात खळबळ माजली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळावारी पत्रकार परिषद घेत अनेक गोप्यस्फोट केले आहेत. तसेच महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली. मात्र या पत्रकार परिषदेच्या सुरूवातीलाच देवेंद्र फडणवीसांनी सर्वांची माफी मागितली.

नमस्कार, मी पहिल्यांदा तुमची क्षमा मागतो की आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणं आपण पहिल्यांदा मराठीत प्रेस घेतो. त्यानंतर हिंदीत करतो. पण शरद पवारांनीच हा विषय राष्ट्रीय केला असल्यानं आज आपला प्रकार बदलून तमाम मराठी पत्रकारांची आणि माय मराठीची क्षमा मागून आजची पत्रकार परिषद हिंदीत सुरू करणार आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं आहे.

या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच फडणवीसांनी शरद पवारांना टोला लगावला. विशेष म्हणजे आज झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेची नियमित प्रथा मोडली आहे. तसेच मला पवारांसारखं इंग्रजी येत नाही, असा टोला देखील देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना यावेळी लगावला आहे.

दरम्यान, या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मुद्द्यांवरून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच 15 तारखेला देशमुख आयसोलेट नव्हते. त्या दिवशी त्यांना अनेक लोक भेटले होते, असा दावा देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या- 

शरद पवारांना चुकीची माहिती देण्यात आली; फडणवीसांनी दाखवला पुरावा!

फडणवीसांचा ठाकरे सरकारवर ‘डेटा बाॅम्ब’; पत्रकार परिषदेत केला मोठा खुलासा

अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या, ‘हा’ महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता

‘मला पवारांसारखं इंग्रजी येत नाही’; देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना टोला

‘धन्यवाद मोदी सरकार’, राष्ट्रवादीकडून पुण्यात बॅनरबाजी; वाचा काय आहे प्रकरण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More