Devendra Fadnavis | राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. फडणवीस यांच्या घराबाहेर देखील सुरक्षेत वाढ करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ऐन निवडणुकीत त्यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आल्याने वेगवेगळ्या चर्चेला उधाण आलं आहे. नागपूर पोलिसांच्या ‘फोर्स वन’ टीमचे जवान शस्त्रांसह फडणवीस यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत. (Devendra Fadnavis)
गुप्तचर यंत्रणांच्या अलर्टनंतर उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. ‘फोर्स वन’चे 12 जवान देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत तैनात करण्यात आले आहेत. गुप्तचर यंत्रणांनी एकापाठोपाठ एक दोन अलर्ट दिल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.
फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ का झाली?
केंद्रीय गुप्तचर यंत्रणांना ‘अल्ट्रा फोर्सेस’कडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवाला धोका आहे, याबाबत कट आखण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली. यानंतर केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून राज्यातील यंत्रणांना त्वरित माहिती देण्यात आली.त्यामुळे फडणवीस यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे.
फडणवीस यांच्या घरी देखील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्यांच्या घराच्या मुख्य गेटवर शस्त्रांसह ‘फोर्स वन’ टीमचे जवानही तैनात करण्यात आले आहेत. सध्या फडणवीस यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. निवडणुकीच्या धामधुमीत फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे.
फडणवीस यांच्या घरी देखील सुरक्षा वाढवली
काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे बाबा सिद्दिकी यांची त्यांच्याच कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली. या प्रकरणी पोलिस अजूनही तपास करत आहेत. या प्रकरणानंतर अभिनेता सलमान खानला देखील धमकी देण्यात आली होती. त्यामुळे त्याची देखील सुरक्षा वाढवण्यात आली. अशात फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती कळताच त्यांची देखील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
News Title – Devendra Fadnavis security increase
महत्त्वाच्या बातम्या-
शरद पवारांचा महायुतीवर आतापर्यंतचा सर्वात गंभीर आरोप; म्हणाले..
विधानसभेत महाविकास आघाडी मारणार बाजी?, सर्व्हेतून मोठी माहिती समोर
दिवाळी पाडव्याला मिळाली आनंदवार्ता, सोनं झालं स्वस्त; पाहा आजचे दर
बारामतीत दोन ठिकाणी पाडवा साजरा होणार?; पार्थ पवारांकडून मोठा खुलासा