बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देवेंद्र फडणवीसांनी कालच्या प्रकारावर संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी- संभाजीराजे

कोल्हापूर |   माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या प्रकारावर सर्व शिव-शाहू भक्तांची माफी मागावी, अशी मागणी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे. त्यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे.

काल छत्रपती छत्रपती शाहू राजांचा स्मृतीदिन असल्याने विविध क्षेत्रातली मंडळी आणि शाहूप्रेमी राजांना अभिवादन करत होते. विविध राजकारण्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शाहू राजांना अभिवादन करणाऱ्या पोस्ट केल्या. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मात्र शाहूराजांना अभिवादन करताना चूक झाली. त्यांनी शाहूराजांना सामाजिक कार्यकर्ते असं विशेषण वापरलं. लोकांनी फडणवीसांना याप्रकरणी चांगलंच धारेवर धरलं. त्यानंतर त्यांनी संबंधित पोस्ट डिलीट केलं.

माझ्यासाहित संपूर्ण राज्यातील शिव-शाहू भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. म्हणून फडणवीसांनी झाल्या प्रकारावर सर्व शिव-शाहू भक्तांची माफी मागावी, असं संभाजीराजे म्हणाले आहेत.

दरम्यान, संभाजीराजे यांनी एक पोस्ट लिहून मी कोणत्या वेळी काय भूमिका घ्यावी, हे मला कुणी शिकवू नये. मी नेहमीच आमच्या घराण्याला शोभेल अशीच भूमिका घेतो, असं म्हणत त्यांच्या टीकाकारांना त्यांनी उत्तर दिलं होतं.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

अतिश्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीवर 2 टक्के कोरोना कर लावा; देशातल्या विचारवंतांची मागणी

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या लोकांना घरी सोडण्यासाठी एस.टी. धावणार- परिवहनमंत्री

महत्वाच्या बातम्या-

“…तर देशात पुन्हा लॉकडाऊन करावं लागेल”

फडणवीसांचं शाहू राजांवर वादग्रस्त ट्विट; छत्रपती संभाजीराजे म्हणतात…

मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक; फडणवीस राज ठाकरेंसह प्रमुख नेत्यांना केलं निमंत्रित

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More