बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“उद्धव ठाकरे आजारी आहेत तोपर्यंत देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करावं”

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackrey) यांच्यावर नुकतीचं मणक्याची शस्त्रक्रिया पार पडली आहे. डॉक्टरांनी त्यांना पुढील काही दिवस आराम करण्यास सांगितलं आहे. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून ते घरूनच काम करत आहेत. मात्र, आता हिवाळी अधिवेशनालाही मुख्यमंत्री अनुपस्थित राहिल्याने विरोधकांनी मु्ख्यमंत्र्यावर टीकास्त्र सोडण्यास सुरुवात केली आहे. या वादात आता रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Aathvale) यांनीही उडी घेतली आहे.
रामदास आठवले यांनी आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना मुख्यमंत्री करण्याचा सल्ला दिला आहे. मला वाटतं की, मुख्यमंत्रीपद इतर कोणाकडे तरी सोपवावं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी आहेत ही गोष्ट खरी आहे. अजून त्यांना ठिक होण्यासाठी 2-3 महिन्यांच्या कालावधी आहे, असं आठवले म्हणाले आहेत.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याआधी राज्याचा चार्ज देण्यात यावा असा सल्ला दिला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्याची पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडेही मुख्यमंत्रीपद देण्याबाबत चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर भाजपच्या काही नेत्यांनी काही कालावधीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांना मुख्यमंत्री बनवावं, असाही सल्ला दिला होता.

दरम्यान, राज्यातील जनतेनं 45 दिवसांपासून मुख्यमंत्र्यांना पाहिलेलं नाही. मुख्यमंत्र्यांनी लवकर बरं व्हावं. पण तोपर्यंत त्यांनी कुणाकडे तरी चार्ज द्यावा, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली होती. हवं तर तिघांचं मिळून एक मंडळ तयार करा आणि आदित्य ठाकरे यांच्याकडे चार्ज द्या, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

थोडक्यात बातम्या

एसटी कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागे घेणार का?, अनिल परबांनी स्पष्टच सांगितलं

भारतीयांची चिंता मिटली! Omicronबाबत दिलासादायक माहिती समोर

“पोलीस काय त्यांच्या बापाचे आहेत का? महाराष्ट्राचा बंगाल होऊ देऊ नका”

‘…तो कुत्रा म्हणजे भास्कर जाधव’, विधानसभेत पुन्हा एकदा राडा

इतका अभ्यास बरा नाही, त्याचं ओझं राज्यपालांना झेपलं पाहिजे- संजय राऊत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More