बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देवेंद्र फडणवीसांनी कुत्र्या-मांजराचा खेळ खेळू नये- एकनाथ खडसे

जळगाव | राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची आकडेवारीही मोठ्या संख्येने वाढत्या आलेखाप्रमाणे वाढत आहे. एकीकडे रूग्णांना बेड उपलब्ध नसल्या कारणाने प्रशासनावर टीका करत आहेत. तर दुसरीकडे राज्य सरकार आणि विरोधकांमध्ये विविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

ज्या ज्या वेळी महाराष्ट्रावर संकट आलं जसं की किल्लारीचा भूकंप, मुंबईमध्ये झालेला 26/11 चा हल्ला किंवा रेल्वेमध्ये झालेले 16 बॉम्बस्फोट अशा अनेक प्रसंगाच्या वेळेस राजकारण बाजूला सोडून विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांनी हातात हात घालून कामं केलं असल्याचं एकनाथ खडसे म्हणाले. जळगावमध्ये ते बोलत होते.

त्यावेळच्या कालखंडामध्ये मी विरोधी पक्षात होतो, विरोधी पक्षनेता होतो. पण अशा संकटामध्ये कुत्र्या मांजराचा खेळ आम्ही खेळलो नाही. देवेंद्र फडणवीस जे करत आहेत ते विरोधी पक्षनेत्याकडून अपेक्षित नाही, असं म्हणत खडसेंनी फडणवीसांवर निशाणा साधला.

दरम्यान, मला वाटलं देवेंद्र फडणवीस एक उत्तम भविष्यकार असतील. त्यांनी चार ते पाच वेळा हे सरकार पडणार असल्याचं सांगितलं आहे. आता तर त्यांनी 2 तारीख दिली आहे आता 2 तारखेपर्यंत वाट पाहतो, नाहीतर फडणवीसांचा भविष्यकाराचा अभ्यास कमी आहे असं मी समजत असल्याचं म्हणत खडसेंनी फडणवीसांना टोला लगावला.

थोडक्यात बातम्या- 

दिवसभरात फक्त 2 लवंग खा… होतील विश्वास बसणार नाहीत इतके फायदे

देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्यावर कारवाई होणार?

“जंतू पार्सल पाठवतो मातोश्रीवर, पहिला प्रयोग तुझ्या घर कोंबडा मुख्यमंत्र्यावर कर”

कोरोनापासून वाचण्यासाठी काय खावं, काय खाऊ नये?, अत्यंत महत्त्वाची माहिती

कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारला दिले हे 5 सल्ले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More