“फडणवीस माफ करतील, मात्र मी नाही, त्यांनी बदला नावाचा एक पोर्टफोलिओ काढावा”
मुंबई | 2019 ला महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून हे सरकार लवकरच पडेल अशी भविष्यवाणी भाजपमधील अनेक नेते अधून-मधून करत होते. अखेर अडीच वर्षानंतर भाजपचा हा शब्द खरा ठरला. शिंदेनी बंड केलं आणि सरकार स्थापन झाल. यासंबधी भाजप(BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील मुंबईत माध्यांमाशी बोलत होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बहुमतचाचणीवेळी म्हणालं होतं मी बदला घेईन आणि मी सगळ्यांना माफ केलं हाच माझा बदला आहे. यावर पाटील म्हणाले “त्यांनी माफ केलं, आम्ही करणार नाही. देवेंद्रजी यांनी बदला नावाचा एक पोर्टफोलिओ (portfolio) उघडला पाहिजे. एक कडक आमदार नेमला पाहिजे जो मागच्या अडीच वर्षाच्या काळातील घोटाळ्याची यादी तयार करेल”
रात्रीनंतर दिवस येतो हे खर झालं. देवेद्रंजी याच सरकार सत्तेत आलं. मी वारंवार बोलत होतो. सरकार नक्की येईल आणि अखेर आपलं सरकार आलं आहे. माझं आणि देवेंद्र फडणवीस यांचं ठरलं होतं की वेळ येईपर्यंत काहीच बोलायचं नाही, असं ते म्हणाले.
गेल्या अडीच वर्षामध्ये महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षण नाही दिलं. धनगर समाजाला विचारल नाही, ओबीसीच आरक्षण घालवलं. अशी टीकाही केली. मराठा समाजासाठी देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) हे मुख्यमंत्री होते तो पर्यंत न्याय मिळाला, असंही ते म्हणाले
थोडक्यात बातम्या
मोठी बातमी! शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला
“संजय राऊत बावचळले आहेत, म्हणून ते…”; भाजप नेत्याची राऊतांवर बोचरी टीका
“केंद्राकडून लोकशाहीचे पंखच नाही तर पायही छाटण्याचा प्रयत्न”
सुष्मिता सेन-ललीत मोदींच्या अफेरवर राखीची प्रतिक्रिया; नरेंद्र मोदींना केला हा सवाल
“राज्याच्या राजकारणात एक दुजे के लिए सिनेमा सुरु”
Comments are closed.