बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘कोरोना लसींबाबत माध्यमांशी बोलण्यापेक्षा केंद्राशी बोलावं’; फडणवीसांनी राजेश टोपेंना सुनावलं

मुंबई | राज्यातील मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलण्यापेक्षा केंद्र सरकारशी संवाद साधावा. देशात सर्वाधिक लसीचा पुरवठा महाराष्ट्रालाच केला जात आहे, असा टोला राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला लगावला आहे.

राज्यात केवळ तीन दिवस पुरेल इतकाच कोरोना लसींचा साठा असल्याची माहिती आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. त्यांच्या या वक्तव्याचा फडणवीसांनी समाचार घेतला आहे. ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे.

राज्यातील मंत्री कोरोना लसीकरणासंदर्भात करत असलेले आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत. राज्याच्या लसीकरण क्षमतेनुसारच टार्गेट ग्रूपला आवश्यक इतक्या लसींचा पुरवठा केंद्राकडून केला जात आहे. माध्यमांमध्ये बोलायचं आणि हात झटकायचं हे आधी बंद झालं पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.

विकेंडला दोन दिवस लॉकडाऊन आणि पाच दिवस कडक निर्बंध असं सरकारकडून सांगण्यात आलं होतं. पण प्रत्यक्षात सर्वच बंद करुन ठेवलं आहे. यामुळे राज्यातील लहान उद्योजक, छोटे व्यापारी आणि नागरिकांचा उद्रेक होईल याची काळजी सरकारनं घ्यावी, असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.

थोडक्यात बातम्या- 

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात रुग्णांना ठेवण्यासाठी जागा शिल्लक नाही; रुग्णांसाठी हाॅटेल्स घेतल्या भाड्याने

“ठाकरे सरकारची स्थिती कन्फ्युजन ही कन्फ्युजन है, सोल्युशन का पता नही अशी झालीये”

सेल्फी काढायला आलेल्या राखीने चाहत्याला सुनावले खडेबोल, पाहा व्हिडीओ

ट्रॅफिक जाममधून सुटका करण्यासाठी त्यांने केलं असं काही की…, पाहा व्हिडीओ

ॲानलाईन शिक्षणासाठी मुलीला मोबाईल दिला, एकदा वडिलांनी मोबाईल तपासताच धक्कादायक बाब समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More