बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तोंडात कोरोनाचे जंतू टाकतो म्हणणाऱ्या शिवसेना आमदाराला फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

मुंबई | मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते, असं वक्तव्य शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केलं. यावर खुद्द विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत संजय गायकवाड यांचा जोरदार समाचार घेतला आहे.

आमदार गायकवाडांची रात्रीची उतरली नसावी म्हणूनच ते असं वक्तव्यं करत आहेत, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी संजय गायकवाड यांनी लगावला आहे. ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते.

कदाचित रात्रीची उतरली नसेल आणि त्यातच आमदार संजय गायकवाड यांनी ती पत्रकार परिषद घेतली असेल. मला त्यांना एकच विनंती करायची आहे की त्यांनी अशाप्रकारे कोरोनाचे विषाणू माझ्या घशात घालण्याआधी हँड ग्लोव्हज घालावेत आणि नीट मास्क लावावं. कारण मला तर जनतेचे आशीर्वाद आहेत. त्यामुळे मला कोरोनाच्या विषाणूने फार काही होईल असं मला वाटत नाही. पण असं म्हणतात की सामान्य माणसांपेक्षा जे तळीराम असतात त्यांना कोरोना लवकर होतो. त्यामुळे त्यांना जर असं करायची इच्छ असेल तर त्यांनी हँड ग्लोव्हज आणि मास्क वापरावा, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

दरम्यान, सध्या राज्यात नव्हे तर संपूर्ण देशभर कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे. मात्र मात्र विरोधी पक्ष यावेळी मदत करायचे सोडून राजकारण करत आहे, असा आरोप बुलडाणा मतदारसंघाचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. तसेच यावेळी त्यांनी एकेरी भाषेचा वापर करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि प्रवीण दरेकर यांचा खरपूस समाचार घेतला.

थोडक्यात बातम्या- 

पंजाबच्या गोलंंदाजांवर गब्बर दहाडला; दिल्लीचा पंजाबवर 6 विकेट्सने दमदार विजय

जे कुठलाही राजकारणी बोलला नाही ते हा माणुस बोलतोय- हेमंत ढोमे

देशाला लागलेली कोरोनापेक्षा घातक कीड म्हणजे राजकारण- तेजस्विनी पंडीत

पुण्यात बापानं 2 पोरींवर ट्रक चढवला अन् स्वतःलाही संपवलं, कारण अत्यंत धक्कादायक

“हे कृत्य करून तुम्ही चुकलात…याची किंमत मोजावी लागणार”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More