बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संजय राऊत म्हणजे बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना- देवेंद्र फडणवीस

मुंबई | पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळालं आहे. ममता बॅनर्जी यांच्यावर देशभरातील नेत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी फोनवरुन ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन केलं. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील ट्विट करुन ममता यांचं अभिनंदन केलं. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलं आहे.

संजय राऊत आणि आघाडीचे नेते म्हणजे बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना आहेत, अशी बोचरी टीका देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केली आहे.

बंगालमध्ये आम्हाला सत्ता मिळाली नाही. पण बंगालमध्ये भगव्याचा बोलबाला आता सुरू झाला आहे. बंगालमध्ये शिवसेनेचा संबंध नाही. राष्ट्रवादी आज हरलेली आहे. काँग्रेसलाही मोठा फटका बसला आहे. ममतादीदींच्या यशामुळे यांना आनंद झाला आहे. मला संजय राऊत यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेलं वक्तव्य ऐकून एका गोष्टीच आश्चर्य वाटत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. बेगानी शादी मे अब्दुला दिवाना हे मी आज पाहिलं. दुसऱ्याच्या घरी मुलगा झाला म्हणून पेढे वाटण्याचं काम करताना हे नेते दिसले, असा टोला देवेंद्र फडणवीस संजय राऊत यांना लगावला आहे.

आम्हाला इतर राज्यात पण योग्य यश मिळालं आहे. बंगालमध्ये आम्हाला अपेक्षित जागा मिळाल्या नसल्या तरी चांगल्या जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीतून दोन गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. बंगाल आता कम्युनिस्ट मुक्त आणि काँग्रेसमुक्त झाला आहे, असं फडणवीसांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या- 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं ममता बॅनर्जींचं अभिनंदन, म्हणाले…

“बंगालमध्ये पराभव झाला म्हणजे मोदी आणि शहांची लोकप्रियता कमी झाली नाही”

“रडीचा डाव सुरु आहे”; ‘त्या’ निकालाबाबत शरद पवार यांची मोठी प्रतिक्रिया

“अजित पवारांना गर्व झाला होता, त्यांची टगेगिरीची भाषा होती, तो गर्व मोडून काढला”

नंदिग्राममध्ये ममतांचा खरंच पराभव झाला का?, तृणमूलचं महत्त्वाचं ट्विट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More