Top News

“राऊत साहेब, हिंदुत्व हिंदुत्व नुसतं बोलायचं नसतं, कृतीतही उतरवावं लागतं”

मुंबई | हिंदुत्वाला जे मानत नाहीत, हिंदुत्वाला जे जुमानत नाहीत, अशा शक्तीसोबत त्यांच्या मांडीला मांडी लावून बसायचं. हिंदुत्वाबद्दल नुसते स्टेटमेंट द्यायचे. याने हिंदुत्व होत नसतं, असा टोला विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना लगावला आहे.

तुम्ही हिंदुत्वावर नुसते स्टेटमेंट देता. याने हिंदुत्व होत नाही, ते कृतीतही उतरवावं लागतं, असं फडणवीस म्हणाले. ते मुंबईत भाजपच्या कार्यकारिणी बैठकीत बोलत होते.

काश्मीरमधील गुपकर आघाडीत काँग्रेस सहभागी आहे. याबाबत काँग्रेसला जाब विचारा. तुम्ही गुपकर आघाडीसोबत कसे जाता? असं त्यांना विचारा, असं आव्हान फडणवीसांनी राऊतांना दिलंय.

संजय राऊत काँग्रेसला असं काही विचारणार नाहीत. कारण त्यांना फक्त सत्तेची पडली आहे, असा आरोप फडणवीसांनी राऊतांवर केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

राज्यातील जनतेने वीज बिल भरु नये- प्रकाश आंबेडकर

“ऊर्जा मंत्री तुम्ही सावकार झालात, सावकारासारखी गरिबांकडून वसुली करत आहात”

मुंबई महापालिकेवर भाजपचाच भगवा फडकणार- देवेंद्र फडणवीस

गुपकर आघाडीत काँग्रेसही सहभागी, देशासमोर काँग्रेसला उघडं पाडू- देवेंद्र फडणवीस

वीजबिल माफ करा, अन्यथा रस्त्यावर उतरु- रक्षा खडसे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या