बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मला पवारांसारखं इंग्रजी येत नाही’; देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना टोला

नवी दिल्ली | परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर केलेल्या गंभीर आरोपांनंतर भाजप नेत्यांनी देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. तर सोमवारी शरद पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत अनिल देशमुख यांना क्लीन चिट दिली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत अनेक गोप्यस्फोट केले आहेत. तसेच महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली आहे.

या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच फडणवीसांनी शरद पवारांना टोला लगावला. विशेष म्हणजे आज झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेची नियमित प्रथा मोडली आहे. तसेच मला पवारांसारखं इंग्रजी येत नाही, असा टोला देखील देवेंद्र फडणवीसांनी लगावला.

मी पहिल्यांदा तुमची क्षमा मागतो की आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आपण पहिल्यांदा मराठीत प्रेस घेतो नंतर हिंदीत करतो. पण शरद पवारांनी हा विषय राष्ट्रीय केला असल्याने आज आपला प्रकार बदलून तमाम मराठी पत्रकारांची आणि माय मराठीची क्षमा मागून मी आजची पत्रकार परिषद हिंदीत सुरु करणार आहे, असं सांगत फडणवीसांनी पत्रकार परिषदेला सुरूवात केली.

दरम्यान, शरद पवारांसारख्या राष्ट्रीय नेत्याच्या तोंडून चुकीची माहिती दिली गेली. देशमुखांना प्रोटेक्ट केलं गेलं. त्यामुळे ते एक्सपोज झाले होते. 15 तारखेला देशमुख आयसोलेट नव्हते. त्या दिवशी त्यांना अनेक लोक भेटले होते, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘धन्यवाद मोदी सरकार’, राष्ट्रवादीकडून पुण्यात बॅनरबाजी; वाचा काय आहे प्रकरण

नव्या बदलासह नवी ‘Royal Enfield’ लवकरच भारतीय बाजारात धडकणार

राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्यांना जयंत पाटलांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

15 वर्षाच्या लेकीने सख्ख्या आईची गळा चिरून केली हत्या; कारण ऐकून सुन्न व्हाल

काँग्रेसला धक्का! ‘हा’ माजी आमदार लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More