नागपूर महाराष्ट्र

“शिवसेनेच्या भगव्यात भेसळ, सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत शिवसेना सत्तेत बसली”

नागपूर | स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत शिवसेना सत्तेत बसली आहे. मग त्यांचा कुठला भगवा, त्यांच्या भगव्यात भेसळ झाली आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर केलीये. ते ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते.

चीनची मदत घेऊन काश्मीरमध्ये कलम 370 पुन्हा आणू, अशी भाषा करणाऱ्या काँग्रेससोबत शिवसेना सत्तेत बसली आहे. ज्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी घाणेरडे लिखाण केले, त्यांच्यासोबत शिवसेना मांडीला मांडी लावून बसली आहे. त्यामुळे आता भगवा तुमचा राहिलेला नाही, असं फडणवीस म्हणालेत.

आमच्या काळात थकबाकी असेल, याचा अर्थ आम्ही गरिबांना सवलत दिली आहे. एकदा तुमच्या सरकारने काय केले आणि आम्ही काय केले, हे समोरासमोर येऊन स्पष्टच करुयात, असं आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.

सामान्य जनतेला वीज बिलात सवलत देण्याच्या आश्वासनावरून सरकारने घूमजाव केलं. शेतकऱ्यांनाही वीज बिलात सूट मिळणार नाही. हा मुद्दा आम्ही प्रचारात उचलून धरू, असं फडणवीसांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

विधान परिषदेची निवडणूक महाविकास आघाडी लढवणार!

वीजबील माफीवरून मनसे आक्रमक, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा 21 फूटांचा पुतळा जाळणार!

भारतात फेब्रुवारीपासून कोव्हिशील्ड लसीच्या वितरणाला सुरुवात; ‘इतक्या’ रूपयांमध्ये मिळणार लस

‘अमृता फडणवीसांच्या गाण्याचा आशय सुंदर’; ‘या’ काँग्रेस नेत्याकडून कौतुक

“माझे कुटुंब माझी जबाबदारीच्या यशानंतर ठाकरे सरकारची नवीन योजना, माझे लाईट बिल माझी जबाबदारी”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या