Top News नागपूर महाराष्ट्र

महाविकास आघाडी सरकार पलटूराम सरकार- देवेंद्र फडणवीस

नागपूर | महाविकास आघाडी सरकार पलटूराम सरकार आहे, अशी बोचरी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते नागपूरमध्ये बोलत होते.

ऊर्जा मंत्री म्हणतात माझा अभ्यास नव्हता, 59 हजार कोटींची थकबाकी आहे हे मला माहित नव्हते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एका वर्षात विदर्भात आले नाही. हे विदर्भ, मराठवाड्यासाठी, उत्तर महाराष्ट्र, कोकण साठी काम करणारं सरकार नाही, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय.

मुख्यमंत्री एका भागासाठी काम करतात, उपमुख्यमंत्री त्यांच्या भागासाठी काम करतात मात्र महाराष्ट्रासाठी कोण काम करेल?, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला.

ही निवडणूक या सरकारच्या काळ्या कारनाम्यांना नाकारण्याची निवडणूक आहे. ही निवडणूक मोदींच्या चांगल्या कामांना पाठिंबा देण्याची निवडणूक आहे, असं फडणवीस म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या-

विविध‌ योजनेअंतर्गत 5 लाख घरकुलांना मंजुरी देणार; हसन मुश्रीफांची घोषणा

दिवाळीत प्रार्थनास्थळं उघडल्यामुळेच कोरोनाचे रुग्ण वाढले- किशोरी पेडणेकर

“कोरोनामुळे सरकारचा महसूल कमी पडतो, त्यामुळे सर्वांना निधी मिळत नाही”

“बावनकुळेंनी इतकंच भारी काम केलं तर मग त्यांचं तिकीट का कापलं?, हे कसले चौकीदार हे तर थकबाकीदार”

“तीन दिवसांत वीज बिलात सवलतीचा निर्णय न घेतल्यास मंत्रालयात घुसून आंदोलन करू”

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या