महाराष्ट्र मुंबई

‘राजा उदार झाला अन् हाती भोपळा आला’; देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका

मुंबई | ज्या सरकारने आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी पुरवणी मागण्या सादर केल्या. विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेत सहभागी होताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर घणाघाती टीका केली.

पूरग्रस्तांना फक्त तीन हजार रुपयांचा धनादेश देणाऱ्या या सरकारची अवस्था राजा उदार झाला अन् हाती भोपळा आला, अशी झाली आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

केंद्राच्या कृषी कायद्याचं बारकाईने विवेचन करताना हा कायदा शेतकरी हिताचाच असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. तसेच तत्कालीन केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी दिलेल्या सूचनांचाच या कृषी कायद्यात समावेश करण्यात आल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

राज्यात आधीपासूनच कंत्राटी शेतीचा कायदा अस्तित्वात आहे. त्याविरोधातही तुम्ही आंदोलनं करणार का?, असा सवालही फडणवीस यांनी केलाय.

थोडक्यात बातम्या-

आईची शपथ घेऊन सांगतो; भर सभागृहात मुनगंटीवारांना का घ्यावी लागली शपथ???

‘चंद्रकांत पाटलांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा’; भाजपच्याच पदाधिकाऱ्यांची मागणी

“महाराष्ट्रात आणीबाणी लागू करून फडणवीसांना सत्तेत यायचंय”

कर्नाटक विधानपरिषदेत गोंधळ; उपसभापतींना खुर्चीवरून खेचलं खाली

ऐकमेकांची डोकी फोडायचीत तर फोडा, पण विज बिलाचं आश्वासनं पूर्ण करा- देवेंद्र फडणवीस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या