बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…तर आम्ही एक मिनिटही बसणार नाही’; सभागृहात फडणवीस आक्रमक

मुंबई | महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे. शेतकरी, मराठा आरक्षण, वाढीव वीज बिल, संजय राठोड या सारख्या अनेक मुद्द्यांवरून हे अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे.

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. आमचं म्हणणं ऐकलं जात नसेल तर आम्ही एक मिनिट बसणार नाही, कामकाज रेटून न्यायचं असेल तर आम्हाला बसवता कशाला?, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

विरोधकांनी गोंधळ करु नये. विरोधकांनी मांडलेल्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा होईल, गोंधळाने काहीही साध्य होणार नाही, अशी भूमिका महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी घेतली आहे.

यंदा दहा दिवस अधिवेशन होणार आहे. 1 ते 10 मार्च असे दहा दिवस अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी असेल. 8 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार असून 9 आणि 10 मार्च रोजी बजेटवर चर्चा होणार आहे. त्यानंतर अधिवेशन समाप्त होईल.

थोडक्यात बातम्या-

संजय राऊतांनी केलं राहुल गांधींचं कौतुक, म्हणाले…

“पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फारच सरळमार्गी नेते आहेत”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर सोपवली ‘ही’ जबाबदारी, म्हणाले…

संजय राठोड यांचा राजीनामा घेण्याची गरज नव्हती, पण…- संजय राऊत

‘मुख्यमंत्र्यांचं आता त्यांचे युवराजही ऐकत नाहीत का?’; व्हिडिओ शेअर करत मनसे नेत्याची आदित्य ठाकरेंवर टीका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More