मुंबई | राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यास हे सरकार लायक आहे. पण आम्ही राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणार नाही, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.
देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकार अर्णव गोस्वामी आणि कंगणा राणावत यांच्या प्रकरणात कोर्टाने दिलेल्या निकालावरून सरकारवर निशाणा साधलाय. राज्यात सत्तेचा दुरुपयोग होत असल्याचं स्पष्ट झालं आहे, असं फडणवीस म्हणालेत.
कंगणा राणावतच्या कार्यालयावर केलेली कारवाई चुकीची असल्याचं कोर्टाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणार? गृहमंत्र्यांवर कारवाई करणार की मुख्यमंत्री स्वत: माफी मागणार?, असा सवालही फडणवीसांनी केला.
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी हे निर्णय पुरेसे असले तरी आम्ही राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणार नाही, असं फडणवीस यांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या-
ज्यांनी चिरडण्याची भाषा केली ते फार काळ टिकले नाहीत- देवेंद्र फडणवीस
“उद्धव ठाकरेंसारखा धमकावणारा मुख्यमंत्री इतिहासात पाहिला नाही
पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्यावर संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
“असा अचानक झालेला काळाचा घाला सर्वांना धक्का देणारा आहे”
पंतप्रधान मोदींची आज पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटला भेट!