महाराष्ट्र मुंबई

“हिंदू काय रस्त्यावर पडले आहेत का?, सरकारला लाज वाटायला हवी”

मुंबई | हिंदू समाज सडका बनलाय, असं वक्तव्य शरजील उस्मानी याने केलंय. यावरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलंय. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

असा कुठला सडक्या डोक्याचा इसम महाराष्ट्रात येऊन हिंदूंना सडका म्हणत असेल आणि सरकार त्याच्यावर कारवाई करत नसेल तर भाजप स्वस्थ बसणार नाही, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

हिंदू काय रस्त्यावर पडले आहेत का? या राज्यात काय मोगलाई आहे का? सरकारला लाज वाटायला हवी, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला केलाय.

गृहमंत्री म्हणतात आम्ही चौकशी करु. सगळ समोर असताना, व्हिडीओ व्हायरल होत असताना कसली चौकशी करता? तात्काळ गुन्हा दाखल करुन त्याला अटक करा, अशी आक्रमक मागणी फडणवीसांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

काँग्रेसने शेतकऱ्याला पिंजऱ्यात पोपट बनवुन ठेवलं होतं, पण…- सदाभाऊ खोत

धक्कादायक! पोलिओ डोसऐवजी पाजलं सॅनिटायझर, 12 बालके रुग्णालयात

“आम्ही निवडणुकीचा फारसा विचार करत नाही, सरकारने जी वचनं दिली पुर्ण करून दाखवणारच”

अर्थसंकल्पानंतर बाबा रामदेव यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा!

लेडी सब इन्स्पेक्टरकडून मानवतेचं दर्शन; एकत्र मृतदेह खांद्यावर घेऊन दोन किलोमीटर प्रवास केला; पाहा व्हिडीओ

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या