बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सर्व केंद्राने करायचं मग राज्याने माशा मारायच्या का?- देवेंद्र फडणवीस

मुंबई | मराठा आरक्षणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केलीये. राज्यांनी ऊठसूट केंद्राकडे बोट दाखवणं थांबवलं पाहिजे. सर्वच जर केंद्राने करायचं तर राज्यांनी काय माशा मारायच्या का?, असा सवाल करत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

102 व्या घटना दुरुस्तीत राज्यांचे अधिकार अबाधित ठेवण्यात आल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने तात्काळ कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करून आपलं म्हणणं मांडलं आहे. त्यामुळे केंद्र सरकारचे आभारीच आहोत, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसेच राज्यपालांच्या हातात काही नसताना देखील सत्ताधारी राज्यपालांना भेटत आहेत. ही सर्व नौटंकी आहे. हा सर्व टाईमपास सुरू आहे, अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

केंद्राने राज्याचे अधिकार अबाधित ठेवले आहेत. राज्य सरकार एखाद्या समाजाला मागास घोषित करू शकतं. मागासवर्ग आयोगाबाबत कोर्टाने दिलेल्या निकालावर राज्याने पुनर्विचार याचिका दाखल करायला हवी, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.

दरम्यान, अशोक चव्हाणांनी केंद्र सरकारवर बोट दाखवू नये. त्यांनी स्वत: राज्यासाठी काही तरी करून दाखवावं. चव्हाणांनी औकातीत राहावं. त्यांची औकात काय आहे हे आम्हाला माहीत आहे. आम्ही काय करावं ते आम्हाला सांगू नये, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

“भारत हिंमत हरलेला नाही, तुम्ही ज्या गंभीर परिस्थितीतून जात आहात त्याची जाणीव आहे”

‘या’ खेळाडूचा कोरोना रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह; भारतीय संघांच्या अडचणीत होऊ शकते वाढ!

अमित शहा ओव्हरेटेड राजकारणी आणि पोल मॅनेजर; प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल

‘जयंत पाटील हे तर…’; पाटलांच्या नाराजीवर अजित पवारांनी सोडलं मौन, म्हणाले….

कोरोनानं अख्खं गाव सुतकात; तरूणांनी केली कमाल अन् गावासाठी उभारलं कोविड सेंटर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More