बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘हा’ कोरोना रोखण्याचा उत्तम मार्ग आहे- देवेंद्र फडणवीस

मुंबई | राज्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. यावरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधलाय. तसेच कोरोनाला रोखण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारला सल्ला दिला आहे. कोरोना चाचण्या वाढवण्याची गरज असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

चाचण्या वाढवणं हाच कोरोना रोखण्याचा उत्तम मार्ग आहे. हे वारंवार सांगूनही न ऐकणार्‍या मविआ शासनाला अखेर सुबुद्धी झाली. दैनंदिन चाचण्या 1 लाखांवर जाण्यासाठी कोरोनाच्या दुसर्‍या लाटेची वाट महाराष्ट्राला पहावी लागली, अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी सरकारवर केली आहे. त्यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे.

राज्यात लॉकडाऊन नाही तर ‘टेस्ट, ट्रेस अँड ट्रीट’ हाच कोरोना रोखण्याचा प्रभावी उपाय आहे. 10 दिवसांत सरासरी 1,26,950 चाचण्या दररोज होत आहेत. दैनंदिन चाचण्या 1 लाखांवर जाण्यासाठी महाराष्ट्राला कोरोनाच्या दुसरऱ्या लाटेची वाट पहावी लागली. येणार्‍या काळात चाचण्यांची संख्या आणखी वाढवायला हवी. राज्याची पूर्ण क्षमता वापरली गेली पाहिजे. आता तरी हे सूत्र कायम ठेवा, असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला दिला आहे.

दरम्यान, वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात रविवारीरात्रीपासून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या दिल्या आहेत.

 

 

थोडक्यात बातम्या- 

फोन टॅपिंगप्रकरणी एकनाथ खडसेंचं खळबळजनक वक्तव्य, म्हणाले…

स्वबळावरच लढणार!; नाना पटोलेंच्या नव्या भूमिकेनं महाविकास आघाडीला मोठा धक्का

…म्हणून महाराष्ट्रातील ‘या’ भाजप आमदाराची थेट पोलीस कोठडीत रवानगी!

दोनदा कोरोना झाल्यानंतर राज्यमंत्री बच्चू कडू पुन्हा आजारी, केलं ‘हे’ महत्त्वाचं आवाहन

सचिननंतर आता भारताच्या ‘या’ स्टार क्रिकेटपटूला देखील कोरोनाची लागण!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More