Top News

शेतकऱ्यांची दिवाळी काळी करणाऱ्या राज्य सरकारचा निषेध- देवेंद्र फडणवीस

मुंबई | आमदार रवी राणा यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना काल पोलिसांनी अटक केली आहे. यापार्श्वभूमीवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निषेध व्यक्त केला आहे.

शेतकऱ्यांची दिवाळी काळी करणाऱ्या राज्य सरकारचा निषेध, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

आमदार रवी राणा हे तर आजही दिवाळीच्या दिवाळीच्या दिवशी कारागृहात आहेत. शेतकऱ्यांची दिवाळी काळी करणाऱ्या राज्य सरकारचा आम्ही निषेध करतो, अशा शब्दात रवी राणा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या कारवाईचा देवेंद्र फडणवीस यांनी निषेध नोंदवला आहे.

दरम्यान, आमदार रवी राणा आणि 18 शेतकऱ्यांवर तिवसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. रात्री उशिरा गुन्हा दाखल झाल्यामुळे रवी राणा यांच्यासह इतर 18 शेतकऱ्यांना पोलीस ठाण्यातच रात्र काढावी लागली आहे.

महत्वाच्या बातम्या-

मला देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रीय स्तरावर मोठं झालेलं पाहायचंय- संजय राऊत

भारतीय नेत्यांविषयी बोलण्याचा ओबामांना कोणी दिला?; संजय राऊत यांचा सवाल

बिहार काँग्रेसमध्ये मोठी फूट पडणार?; आमदार एनडीएत सामील होण्याची शक्यत

“किरीट सोमय्या यांच्या बोलण्याला त्यांचा पक्षही गांभीर्याने घेत नाही, त्यामुळे त्यांनी…”

नितीश कुमारांनी दिला राजीनामा, नेता निवडीसाठी एनडीएची उद्या बैठक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या