महाराष्ट्र मुंबई

मूठभर बिल्डरांच्या फायद्याचा प्रस्ताव मागे घ्या- देवेंद्र फडणवीस

मुंबई | मूठभर खासगी लोकांचं चांगभलं करण्याचं काम केलं जात असून, त्यातून राज्याचे हजारो कोटींचं नुकसान होणार आहे. त्यामुळे हा प्रस्ताव तत्काळ मागे घ्यावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे.

बांधकाम क्षेत्राला उभारी देण्यासाठी प्रीमियममध्ये 50 टक्के सूट देण्याचा प्रस्ताव सरकारसमोर आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र पाठवलं आहे.

बांधकाम क्षेत्राला उभारी देण्यासंदर्भात दीपक पारेख यांच्या अध्यक्षतेखाली समितीने राज्य सरकारला काही शिफारशी केल्या होत्या. मात्र, यातील निवडक आणि सोयीच्या शिफारशींची अंमलबजावणी केली जात आहे. त्यामुळे काही निवडक लोकांचा फायदा होणार असून राज्याच्या तिजोरीला मोठा फटका बसणार आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला आहे.

आर्थिक स्थिती चांगली नसल्याचे सांगत असताना तिजोरीची अशी उघड लूट होणार नाही, हीच अपेक्षा आहे. याप्रकरणी कार्यवाही न झाल्यास हायकोर्टात याचिका दाखल करण्याचा इशाराही फडणवीस यांनी दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

हे काय पंतप्रधानपद आहे का?; पी चिदंबरम यांनी उडवली शरद पवारांची खिल्ली

सिनेमा पाहण्यासाठी गावकऱ्यांनी केला हा अजब जुगाड!

गाड्यांवर जातिसूचक स्टिकर लावणं महागात पडणार!

“असा तेजस्वी पंतप्रधान भारताला लाभणं, हे आपलं सौभाग्यच”

“मी दबावाखाली मुख्यमंत्री पद स्वीकारलं; कोणालाही मुख्यमंत्री बनवा मला…”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या