पुणे महाराष्ट्र

ठाकरे सरकारकडून प्रामाणिक शेतकर्‍यांना ठेंगा दाखवण्याचं काम- देवेंद्र फडणवीस

पुणे | प्रामाणिक शेतकर्‍यांना ठेंगा दाखवण्याचं काम या सरकारने केलं आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते पुण्यात बोलत होते.

देवेंद्र फडणवीस पुण्याच्या मांजरी बुद्रूक येथे शेतकरी संवाद यात्रेत सहभागी झाले. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी नव्या कृषी कायद्यांचं समर्थन केलं.

नरेंद्र मोदी नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे ट्रानस्फर करणार आहेत. आमच्या शेतकऱ्याला मुक्ती मिळाली पाहिजे, जिथे माल विकायचा आहे तिथे विकता आला पाहिजे आणि त्यासाठी बंधन नसलं पाहिजे. शेतकऱ्याला मालक बनवण्यासाठी मोदींनी हे कायदे आणले आहेत, असं फडणवीसांनी यावेळी सांगितलं.

काही लोकं तर दुटप्पी भूमिका घेतात. कंत्राटी शेतीचा कायदा महाराष्ट्राने 2006 मध्ये केला. मोदींनी देशासाठी जो कंत्राटी शेतीचा कायदा केला आहे तो 2006 सालीच राज्यात झाला आहे. 2006 ते 2020 पर्यंत 14 वर्षात कुठेही शेतकऱ्याची शेती गेली, लुबाडलं, नुकसान झालं अशी एकही घटना झाली नाही, असं फडणवीसांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

नरेंद्र मोदी हेच शेतकऱ्यांचे खरे हितचिंतक आहेत- अमित शहा

“रावसाहेब दानवेंचा पराभव करत नाही, तोपर्यंत डोक्यावरची टोपी काढणार नाही”

जळगावात भाजपला धक्का; ‘या’ नेत्याने दिली भाजपला सोडचिठ्ठी

आधी काश्मीर ताब्यात घेऊ, मग भारतावर हल्ला करू- शोएब अख्तर

आमदारकी नाही मिळाली तरी काम करत राहणार- ऊर्मिला मातोंडकर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या