उस्मानाबाद | मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात काही जणांना चार हजार, पाच हजार अशी मदत देण्यात आली. अशा प्रकारची मदत करुन शेतकऱ्यांच्या जखणेवर मीठ चोळण्याचं काम करु नये, असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या पाहणी दौऱ्याचा आज दुसरा दिवस असून ते उस्मानाबादच्या दौऱ्यावर आहेत. ते उस्मानाबादमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
राज्य सरकारने तात्काळ पंचनामे संपवले पाहिजेत, पंचनामे होणार नाही तिथे मोबाइलने फोटो पाठवल्यास मदत दिली जाईल अशी भूमिका घेतली पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
Comments are closed.