बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“जागा किती तर 56 अन् बाता मात्र मोठ्या”, देवेंद्र फडणवीसांची खोचक टीका

मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या (Trinamool Congress) सर्वेसर्वा तथा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (West Bengal CM Mamata Banerjee) विरोधी पक्षांच्या भेटीगाठी घेत आहेत. ममता बॅनर्जी यांनी शिवसेनेच्या (ShivSena) नेत्यांच्या तसेच राष्ट्रवादीचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. त्यावरून देवेंद्र फडणवीसांची (Devendra Fadnavis) भाष्य केलं आहे.

काँग्रेसला (Congress) वगळून सगळ्या पक्षांना एकत्र आणूण मोट बांधण्याचे ममता पवारांचे प्रयत्न आहेत. त्याकरिता या राजकीय बैठका होत आहेत. सगळ्यांनाच हे मान्य असेल की, 2024 ला मोदीच (PM Narendra Modi) सत्तेत येणार आहेत. त्यामुळे त्यांना हरवण्यासाठी काय रणनीती करता येईल, यासाठी ही खलबतं चालली आहेत. तसेच कशाप्रकारे सगळ्यांना एकत्र येता येईल, त्यासाठी देखील खलबतं होत आहेत, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले आहेत.

तसेच यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. शिवसेनेचे नेते म्हणतात की, पश्चिम बंगाल कुणासमोर झुकणार नाही. तसेच महाराष्ट्रातही कोणासमोर झुकणार नाही. पत्रकारांनी विचारलेल्या या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनी ‘जागा किती आहेत तर फक्त 56 आणि बाता मात्र मोठ्या आहेत’, अशी बोचरी टीका देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेवर केली आहे.

दरम्यान, शिवसेनेने किती लांगुलचालन केलं तरी त्याचा काही फायदा होणार नाही. मतांसाठी हिंदूत्व विरोधी पक्षांना डोक्यावर घेऊन फिरावं लागतयं. तसेच सावरकरांना भारतरत्न नाही दिला तरी चालेल परंतु, शिवसेनेचं बेगडी हिंदूत्व जनतेला आवडणार नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. शिवसेनेचं बेगडी सावरकर प्रेम उघड झालं आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

“मंत्रीच पायघड्या घालतात, ‘ती’ भेट घेऊन शिवसेनेनं महाराष्ट्र द्रोह केला”

‘या’ कंपनीच्या फोनचा मोठ्ठा स्फोट, ब्रँडचं नाव ऐकाल तर धक्काच बसेल

अवकाळी पावसाचा राडा, त्यातच हवामान खात्याकडून ‘या’ मोठ्या संकटाचा इशारा

कोणता झेंडा घेऊ हाती?, एक-दोन नव्हे तर ‘या’ नेत्याने केलं पाचव्यांदा पक्षांतर

महाराष्ट्रातील ‘या’ शहराचं टेंशन वाढलं, नायजेरियातून आलेल्या मायलेकी पॉझिटीव्ह

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More