बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ज्या दिवशी हे सरकार पडेल त्या दिवशी आम्ही…- देवेंद्र फडणवीस

मुंबई | सत्तेत येण्यासाठी आम्ही कोणताही प्रयत्न करणार नाही. हे सरकार आपल्याच ओझ्याने पडणार आहे. ज्या दिवशी हे सरकार पडेल, त्या दिवशी आम्ही अल्टरनेट देऊ, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. राज्याचं अधिवेशन घेण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

देशाच्या 70-72 वर्षाच्या इतिहासात असली सरकारे चालताना दिसली नाही. पण आम्ही सरकार पाडणार नाही. हे सरकार आपल्याच ओझ्याने हे सरकार पडणार आहे. ज्या दिवशी हे सरकार पडेल, त्या दिवशी आम्ही पर्याय देऊ, देवेंद्र असं फडणवीस यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री आघाडीतील मित्रपक्षांवर नाराज आहेत की नाही मला माहीत नाही. पण जनता सरकारवर नाराज आहे. ही तीन पक्षांची नौटंकी आहे. पदोन्नतीतील आरक्षणावर काँग्रेसने तलवारी उपसल्या होत्या. त्याचा जीआरही निघाला, सर्व काही झालं. काँग्रेसने तलवारी म्या केल्या असून गप्प बसले आहेत. केवळ दाखवण्यासाठी काँग्रेस भांडत असते, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केलीये.

दरम्यान, तीन पक्षात विसंवाद आहे, त्यांच्यात एकमेकांवर विश्वास राहिला नाही, हे सर्वांना माहीत आहे. पण तुमच्या भानगडीत जनतेला का भरडता?, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला केला आहे.

थोडक्यात बातम्या- 

“कोणी कोणाचं ऐकायचं नाही, हा एकच सरकारमधील किमान समान कार्यक्रम”

“आपणच बॉस असून पवारांना फाट्यावर मारतो हे मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिलं”

दिलासादायक! महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणत घट, वाचा आजची आकडेवारी

‘भावा गर्लफ्रेंड iphone मागत आहे’; चाहत्याच्या प्रश्नावर सोनूचं भन्नाट उत्तर, म्हणाला….

आनंदाची बातमी! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे शहराने करून दाखवलं, वाचा आजची आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More