मुंबई | भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiyya) यांच्यावरील हल्ल्यानंतर भाजप नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. पोलिसांच्या संरक्षणामध्ये गुंडशाही सुरू असून रविवारी गृहसचिवांची भेट घेणार असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
आपल्यावर हल्ला होणार याची माहिती किरीट सोमय्यांनी आधीच पोलिसांना दिली होती. त्यावर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. पोलिसांच्या संरक्षणामध्ये ही गुंडगिरी सुरू आहे. मुंबई पोलिसांची अब्रू या पोलिसांनी घालवली आहे. लोकशाही पायाखाली घातली जात आहे, असा घणाघात देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.
तुम्ही आम्हाला घाबरवू शकत नाहीत. जशात तसं उत्तर देण्याची धमक आमच्यात आहे. हे तात्काळ बंद नाही झालं तर आम्ही आक्रमक भूमिका घेणार, असा इशारा देवेंद्र फडणवीसांनी दिला आहे. जे यांचे घोटाळे बाहेर काढण्याचं काम करत आहेत, हे त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप फडणवीसांनी केला.
दरम्यान, एका महिलेला हे सरकार घाबरलं आणि अख्खी मुंबई वेठीस धरण्याचं काम या राज्य सरकारनं केलं आहे. तर राजकीय कार्यकर्त्यासह वागणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा, अशी मागणी देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.
थोडक्यात बातम्या-
‘आय रिपीट…’, संजय राऊतांचा भाजपला थेट इशारा
“उद्धव ठाकरे बिनकामी पूर्ण पगारी मुख्यमंत्री”; राणांचे धारदार बाण चालूच
“मुख्यमंत्र्यांवर कितीही हल्ले झाले तरी ठाकरेंचा संयम ढळला नाही”
“उद्धव ठाकरे महाराष्ट्राला लागलेला शनी”; नवनीत राणांची जहरी टीका
राज्याच्या राजकारणात खळबळ! शिवसेना मंत्र्याच्या पीएवर गोळीबार
Comments are closed.