Top News

“होय, आहे मी ब्राह्मण; पवारांना माझ्या जातीबद्दल बोलावं लागतं यातच माझं यश”

मुंबई | मी ब्राह्मण आहे हे संपूर्ण जगाला ठाऊक आहे. पण पवारांना वारंवार याचा उल्लेख करावा लागतो यातच माझं यश आहे, असा टोला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लगावला आहे.

पाच वर्षामध्ये मी काय केलं, काय नाही केलं किंवा मी नेता झालो की नाही झालो किंवा मला लोकं मानतात की नाही मानतात हे ठाऊक नाही. पण माझ्या नेतृत्वाचं एकच यश आहे ते म्हणजे पवारसाहेब हे पुरोगामी नेते असूनही त्यांना प्रत्येक वेळी माझ्या जातीची आठवण करुन द्यावी लागते, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

शरद पवार थेट उल्लेख करु शकत नाहीत पण अप्रत्यक्षरित्या अनेकदा त्यांना माझ्या जातीची आठवण करुन द्यावी लागते हे माझं यश आहे, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे.

दरम्यान, मला खरोखर असं वाटतं की महाराष्ट्राच्या या संपूर्ण राजकीय पटावर मी निश्चित माझं काहीतरी स्थान मिळवलं असेल अन्यथा वारंवार अडून अडून मी कोणत्या जातीचा आहे हे सांगण्याची गरज पवारसाहेबांना तरी पडली नसती, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या