महाराष्ट्र मुंबई

राहुल गांधींचं ‘ते’ वक्तव्य गंभीर, संपूर्ण दोष मुख्यमंत्र्यांवर ढकलण्याचा प्रयत्न- देवेंद्र फडणवीस

मुंबई | राज्यातील कोरोना आणि राजकीय परिस्थितीवर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलंय.

राहुल गांधी यांचं आजचं वक्तव्य अतिशय गंभीर आहे. स्वतःच्या जबाबदारीपासून पळणारे हे वक्तव्य आहे. त्यांच्या वक्तव्यावरून काँग्रेस पक्ष आपली जबाबदारी झटकून संपूर्ण दोष मुख्यमंत्र्यांवर आणि शिवसेनेवर ढकलण्याचा प्रयत्न करत आहे, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय.

कोरोनामुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीविषयी चिंता व्यक्त करतानाच हे सरकार पाडण्यात भाजपला रस नाही, अशी स्पष्ट भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे.

राज्य सरकारमध्ये समन्वय नाही. या काळात खर्च कशावर झाला, हे पाहिले तर सरकारची प्राथमिकता काय हे दिसून येईल. सध्या लढाई करोनाविरुद्ध आहे. सरकार पाडण्यात आम्हाला रस नाही. ते स्वतःच्या अंतर्विरोधातून पडेल, असंही फडणवीसांनी सांगितलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

केंद्राने ठाकरे सरकारला आत्तापर्यंत ‘इतक्या’ हजार कोटींची मदत केली- देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रात आमचा सरकारला पाठिंबा, पण…- राहुल गांधी

महत्वाच्या बातम्या-

विमानातून आलेल्या ‘भावा’ला सन्मानाने पाठवलं, आम्ही अजून काय करायला हवं?- शाहिद आफ्रिदी

भाजपमधील माणसं सत्तेसाठी हपापलेली आहेत- पृथ्वीराज चव्हाण

सरकार पाडण्यात आम्हाला काहीही रस नाही- देवेंद्र फडणवीस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या