Maratha Reservation | ‘…त्यांना कुणबी आरक्षण मिळणार नाही’; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले

Maratha Reservation | सरकारने मनोज जरांगेंच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या आहेत. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना फडणवीसांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. ज्यांच्या नोंदी सापडलेल्या नाहीत त्यांना आरक्षण देण्याबाबतचा निर्णय झालेला नाही, त्यामुळे ओबीसी समाजावर कोणताही अन्याय झालेला नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले

मला अतिशय आनंद आहे की, काल जे आंदोलन, उपोषण सुरु होतं त्यावर अतिशय चांगला मार्गा निघून त्याची सांगता झाली आहे. आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने या संदर्भात अतिशय सकारत्मकता दाखवली होती. आम्हाला आज आनंद आहे की, मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आज प्रश्न सुटलेला आहे. मी मनोज जरांगे पाटील यांचं अभिनंदन करतो आणि त्यांचेही आभार मानतो. त्यांनी हा मार्ग स्वीकारला, असं फडणवीस म्हणालेत.

आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो की, जो काही मार्ग आहे तो कायदेशीर काढावा लागेल, संविधानाच्या आधारावर काढावा लागेल, म्हणून आपल्याला सरसकट करता येणार नाही. पण ज्यांच्याकडे नोंदी आहेत त्यांच्या रक्त नात्यातील लोकांना आपल्याला ते देता येईल, असं फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.

Maratha Reservation | “ओबीसी समाजावर कोणताही अन्याय झालेला नाही”

ओबीसी बांधवांच्या मनात जी भीती होती की, कुठेतरी आमच्यावर अन्याय होईल का, पण त्यांच्यावरही कोणताही अन्याय आम्ही होऊ दिलेला नाही. त्यामुळे मला असं वाटतं की, राज्यातील सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. त्यातून सर्वात चांगला निर्णय आज घेण्यात आलाय. ओबीसी समाजावर कोणताही अन्याय झालेला नाही, असं फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.

नोंदी असलेल्यांना प्रमाणपत्र मिळायला ज्या अडचणी येत होत्या त्या अडचणी आपण दूर केल्या आहेत. ज्यांच्या नोंदी नाहीत किंवा ज्यांच्याकडे पुरावा नाहीत अशा लोकांना आरक्षण देण्याबाबतचा निर्णय झालेला नाही, असं त्यांनी सांगितलं आहे.

ज्या लोकांचा खऱ्या अर्थाने कायदेशीरदृष्ट्या अधिकार होता पण त्यांना ते मिळत नव्हतं, कार्यपद्धती खूल क्लिपष्ट होती त्यामुळे त्यांना प्रमाणपत्र मिळू शकत नव्हतं, अशा लोकांना सोप्या पद्धतीने प्रमाणपत्र मिळेल, अशी कर्यपद्धती केल्याचं फडणवीसांनी म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या- 

Bigg Boss 17 | फिनालेपूर्वीच ‘बिग बॉस’च्या विजेत्याचा खुलासा?, व्हिडीओ पाहून चाहत्यांना धक्का

Maratha Reservation | ‘मराठा आरक्षण अजिबात टिकणार नाही?’, सरकारमधील मंत्र्यानेच बोलून दाखवलं

Maratha Reservation | सरकारकडून जरांगेंच्या मागण्या मान्य; छगन भुजबळांनी घेतला मोठा निर्णय

Maratha reservation GR | ‘…तरच मिळणार कुणबी प्रमाणपत्र’; जीआरमध्ये नेमकं काय म्हटलंय?

Manoj Jarange | मुख्यमंत्र्यांसमोरच मनोज जरांगे यांचं मोठं वक्तव्य!