एकनाथ शिंदेंच्या भूमिकेबद्दल देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट!

Devendra Fadnavis l राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं आहे. मात्र या यशानंतर देखील सरकार स्थापनेला विलंब झाला असल्याने राजकियाच्या राजकारणात उलट-सुलट चर्चा देखील सुरु होत्या. मात्र आता 5 डिसेंबरला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मात्र आता या शपथविधी सोहळ्यानंतर नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेसंदर्भात सर्वात मोठा खुलासा केला आहे.

फडणवीसांनी केला मोठा खुलासा :

विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर 2024 ला जाहीर झाला. या निवडणुकीत महायुतीने 230 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवला आहे. तसेच यावेळी विधानसभा निवडणुक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदी कायम रहावे अशी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांची, पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची इच्छा होती. तसेच या निकालानंतर काही दिवस एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी मागणी देखील त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी बोलून दाखवली होती.

मात्र यावरुन प्रचंड संभ्रम वाढल्यावर एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकार स्थापनेत माझ्याकडून कुठलीही अडचण येणार नाही असं सांगितलं होत. त्यामुळे भाजपला मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा दिल्यानंतर मग, एकनाथ शिंदे हे राज्यातील गृहखात्यासाठी अडून बसल्याच समोर आलं होत. मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी खुलासा केला आहे.

Devendra Fadnavis l फडणवीस शिंदेंबद्दल काय म्हणाले? :

“मुख्यमंत्री हा भाजपचा होणार हे एकनाथ शिंदे यांनी देखील महायुतीच्या पहिल्याच बैठकीत मान्य केलं होतं” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. तसेच पक्षाने 137 जागा जिंकल्यामुळे मुख्यमंत्री भाजपचा होणार हे पक्षाने देखील आधीच ठरवलं होतं असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, “एकनाथ शिंदे यांच्या पक्षात दोन मतप्रवाह होते. एकनाथ शिंदे यांनी सरकारमध्ये सहभागी व्हावं असं देखील अनेकांच मत होतं. मात्र काहींच असं सुद्धा मत होतं की एकनाथ शिंदेंनी सरकारमध्ये सहभागी होण्याऐवजी कॉर्डिनेशन कमेटीच चेअरमन बनावं. त्यामुळे राज्यात एकनाथ शिंदे हे अविभाज्य घटक असल्याचं दिसून आलं आहे.

News Title – Devendra Fadnavis Statement On Eknath Shinde

महत्त्वाच्या बातम्या :

रेल्वे विभागात नोकरीची सुवर्णसंधी! जाणून घ्या पात्रता आणि रिक्त पदे

शाकाहारी लोकांना Heart attack चा धोका सर्वात कमी?, नवीन संशोधन समोर

वर्षाच्या शेवटच्या महिन्यात काय आहेत सोने-चांदीचे दर?, जाणून घ्या एका क्लिकवर

एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं; पवना धरणात घडली दुःखद घटना

पिंपरी-चिंचवडमधील तब्बल ‘एवढ्या’ लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या!