“जर कोणी हिटरल प्रवृत्तीनं वागायचं ठरवलं असेल तर…”
मुंबई | राज्याची राजधानी मुंबईत दोन दिवस मोठा गोंधळ पाहायला मिळाला होता. अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी शिवसेनेला इशारा दिल्यानंतर हजारोंच्या संख्येनं शिवसैनिक रस्त्यावर उतरल्यानं कायदा आणि सुव्यवस्थेची दैना झाली. त्यानंतर राज्यात भाजप विरूद्ध शिवसेना वाद पेटला आहे. अशात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
भोंगा, हनुमान चालीसावरून राज्यात वाद पेटू नयेत म्हणून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीला भाजपचे नेते गैरहजर राहिल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. फडणवीस यांना याबाबत विचारलं असता त्यांनी उत्तर दिलंय. मागील चार-पाच दिवसात आम्ही मुंबई आणि महाराष्ट्रात पाहतोय त्या घटना पाहिल्यानंतर सरकारनं संवादाला जागा ठेवलीये असं आम्हाला वाटत नाही, असं फडणवीस म्हणाले आहेत.
जर कोणी हिटरल प्रवृत्तीनंच वागायचं ठरवलं असेल तर त्यांच्याशी संवादापेक्षा संघर्ष केलेला बरा, असा इशारा देखील फडणवीसांनी ठाकरे सरकारला दिला आहे. यावरून आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. हिटलरशाही सुरू झाल्याची आमची मानसिकता झाल्यानं आम्ही आजच्या बैठकीवर बहिष्कार घातला आहे, असं फडणवीस म्हणाले आहेत.
विरोधी पक्षाला जिवानिशी संपवायची मानसिकता सरकारची असेल तर आम्ही बैठकीला जाऊन काय फायदा, असा सवाल फडणवीसांनी केला आहे. दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांकडून झालेल्या हल्ल्यावर फडणवीस संतापल्याचं पाहायला मिळालं होतं.
थोडक्यात बातम्या –
“निवडणुका होण्यापूर्वीच मी येणार मी येणारच्या घोषणा दिल्या आता मात्र…”
किरीट सोमय्यांवरील हल्ल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी उचललं ‘हे’ मोठं पाऊल
“…तर लोक या महाराष्ट्रद्रोह्यांना जागोजागी चपला मारतील”
‘या’ खास कारणामुळे ट्विटरवर ट्रेंड होतोय शाहरूखचा मन्नत बंगला
महाराष्ट्रावर दुहेरी संकट, हा आठवडा महत्त्वाचा
Comments are closed.