“मी हळूहळू सर्व गोष्टी बाहेर काढणारे, काळजी करू नका”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | गेल्या काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत मोठी गौप्यस्फोट केला होता. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (Ncp) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रत्युत्तर देताना शपथविधीमुळे झालेला फायदा सांगितला. दोघांच्या वक्तव्यानंतर राज्यात अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. आता पुन्हा फडणवीसांनी मी अजून काही गोष्टी बाहेर काढणार असल्याचं म्हटलंय.

मी काहीही बोललो की समोरून आणखी दुसरी गोष्ट बोलली जाते. त्यामुळे मी हळूहळू सर्व गोष्टी बाहेर काढणार आहे. काळजी करू नका. तुम्हाल सगळे समजेल, असं सूचक वक्तव्य देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं आहे.

दरम्यान, 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) आणि अजित पवार(Ajit Pawar) यांचा झालेला पहाटेचा शपथविधी आजापर्यंत महाराष्ट्राची जनता विसरू शकली नाही.

एका रात्रीत ही घडामोड घडली होती त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं होतं मात्र शरद पवार यांनी पुढच्या दोन दिवसात सगळ्या आमदारांना परत आणलं. आणि हे सरकार पडलं.

दरम्यान, इतक्या वर्षानंतरही पहाटेच्या शपथविधीबाबत अनेक तर्त-वितर्क तसेच आरोप प्रत्योरोप सुरू आहेत. अशात दोन्ही पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांनी आता याबाबत भाष्य केलंय.

महत्त्वाच्या बातम्या-