बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुख्यमंत्रिपदाविषयी कुणी स्वप्न पाहायला काही हरकत नाही- देवेंद्र फडणवीस

नांदेड | शरद पवार यांना पंतप्रधान तर अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी कार्यकर्त्यांनी झपाटून कामाला लागणं गरजेचं आहे, असं वक्तव्य खासदार अमोल कोल्हे यांनी केलं आहे. भोसरी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे.

अजितदादांच्या मुख्यमंत्रिपदाविषयी कुणी स्वप्न पाहायला काही हरकत नाही. स्वप्न कुणीही पाहू शकतं. परंतु या तिन्ही पक्षात समन्वय नाही हे मी आधीपासून सांगत आलोय. त्यांच्या मधील समन्वयाच्या अभावमुळे त्यांच्या-त्यांच्यामध्येच अडचणी निर्माण होतायत, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

समन्वय नाही, इथपर्यंत ठीक आहे पण यांच्या समन्वयाच्या अभावामुळे जनतेला त्रास होतोय, त्याचं काय?, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला केला आहे. तसंच जाताजाता जनतेसाठी स्वप्न बघा, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

दरम्यान, आपणाला शरद पवार यांना पंतप्रधान या सर्वोच्च पदावर बसलेलं पहायचं असेल तर त्यांना पिंपरी चिंचवड सारख्या शहरात लक्ष घालावायला लागू नये अशी माझी भावना असल्याचं अमोल कोल्हे यांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या- 

निवृत्त प्राध्यापकानं केलं असं काम, दोन वर्षात गाव झालं दुष्काळमुक्त!

‘मला VIP गेस्ट म्हणून तिथं बोलवलं होतं’, ‘त्या’ बड्या अभिनेत्याच्या मुलाचा खुलासा

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी; पुढील दोन-तीन दिवस पाऊस झोडपून काढणार

‘महेश मांजरेकर कोण आहेत?’; जितेंद्र आव्हाड संतापले

एनसीबीची आणखी एक मोठी धाड; रेव्ह पार्टीतून अभिनेत्याच्या मुलासह 10 जण ताब्यात

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More